कोरड्या रंगांचीच उधळण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

सांगली - शहरात गल्लोगल्लीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई रंगात न्हाऊन निघालेला बालचमू, महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग असेच आजच्या रंगपंचमीचे चित्र होते. दुचाकी वरून फिरणारे घोळके पाण्याच्या फवाऱ्यांत आणि कोरडे रंग मुक्तपणे उधळत होते. गणपतीपेठ विश्रामबागसह परिसर रंगांत न्हाऊन निघाला. विविध ठिकाणी सकाळी दहानंतर रस्ते फुलले. अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंदपणे नाचत होती. लहानथोरांपर्यंत सर्वांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. आतुरतेने वाट पाहणारे चिमुकले सकाळी आठपासून पिचकाऱ्या आणि रंग घेऊन रस्त्यावर आले.

सांगली - शहरात गल्लोगल्लीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई रंगात न्हाऊन निघालेला बालचमू, महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग असेच आजच्या रंगपंचमीचे चित्र होते. दुचाकी वरून फिरणारे घोळके पाण्याच्या फवाऱ्यांत आणि कोरडे रंग मुक्तपणे उधळत होते. गणपतीपेठ विश्रामबागसह परिसर रंगांत न्हाऊन निघाला. विविध ठिकाणी सकाळी दहानंतर रस्ते फुलले. अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंदपणे नाचत होती. लहानथोरांपर्यंत सर्वांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. आतुरतेने वाट पाहणारे चिमुकले सकाळी आठपासून पिचकाऱ्या आणि रंग घेऊन रस्त्यावर आले. फेव्हरीट कार्टूनच्या आकाराच्या पिचकाऱ्यांतून ते लहान-मोठ्या साऱ्यांवर रंग टाकत होते. त्वचेला इजा होणार नाही, अशा रंगांचा वापर वाढल्याचे आज स्पष्टपणे दिसले. शाळा-महाविद्यालयांना आज सुटी असल्याने तरुणाईने मोटारसायकलवरून रंगांची उधाळण करत, आनंद लुटला. सारे रस्तेही रंगात न्हाऊन निघाले. तरुणीही मागे नव्हत्या. गटा-गटाने त्यांची रंगपंचमी सुरू होती. 

लाल-गुलाबी, पिवळ्या-निळ्या सुक्‍या रंगांची उधळण करीत लहान-थोर साऱ्यांनी जल्लोष केला. सुटीचा असल्याने उत्साहाला उधाण आले. रस्तेही रंगले आणि चेहरे, कपड्यांवर रंग उडाला आणि दुचाकीही रंगल्या. काहीजण सुटी असूनही कॉलेजवर जमले. तेथे त्यांनी रंगपंचमी साजरी केली. शहरात टंचाई असल्याने बॅरेलमध्ये बुडवून रंग खेळण्याचा प्रकार फारसा दिसला नाही. वॉलचंद कॉलेज, विग्लिंडन कॉलेज, विश्रामबाग चौक, महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृह, कॉलेज कॉर्नर, चांदणी चौक, शंभर फुटी रस्ता, कॉंग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक, गावभाग, गणपती पेठ, बुरूड गल्ली, रणझुंजार चौक, बालाजी चौक, मित्रमंडळ चौक, बाजरपेठ आदी ठिकाणी सकाळी आठपासून रंगपंचमीची सुरवात झाली होती. परीक्षा तोंडावर असली तरी मुलांना रंग खेळण्यास पालकांनीही मज्जाव केला नाही. 

गपणतीपेठेतील रंग विक्रेते मकसुद तांबोळी यांनी सांगितले, की सकाळपासून पाच-दहा किलो वजनाची रंगाची 700 हून अधिक ठिक्की विकली गेली. मुलांकडून केमिकल्स रंगांचा वापर कमी झाला आहे. आम्हीसुद्धा तसे कमीच रंग विक्रीसाठी ठेवले आहेत. लहान मुलांनी सुक्‍या रंगांचीच खरेदी केली. यंदाच्या वर्षी फक्कीलाही मागणी आहे. 

पोलिसांची गस्त 

रंगपंचमीला तरुणाई हुलडबाजी करते. त्यातून वाद होऊ नयेत म्हणून पोलिसांची गस्त चौकाचौकांत सुरू होती. त्यामुळे साहजिकच तरुणाईने शांततेत रंग खेळले. 

बाजारपेठ बंद 

गणपतीपेठेतील निम्म्याहून अधिक दुकाने आज बंद राहिली. कामगार, मालकांनीही बाजारात रंग खेळले. त्यात हमालांनीही भाग घेतला. 

Web Title: rangpanchami celebration in sangli

टॅग्स