अमरावतीच्या तरुणीवर शिर्डीमध्ये बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

शिर्डी - लग्न जुळवून देण्याच्या आमिषातून अमरावती येथील २९ वर्षीय तरुणीवर एकाने आठ वर्षे शिर्डीत वारंवार बलात्कार केला. तिला अश्‍लील ई-मेल पाठवून ‘ब्लॅकमेल’ केले. नरेंद्र विठ्ठल गुहे (वय ५०, रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने गुहे यास पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला. राहाता न्यायालयाने गुहे यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली. फिर्यादीत पीडित तरुणीने म्हटले आहे, की शेगाव येथे माझ्या कुटुंबीयांची गुहे याच्यासोबत ओळख झाली. ‘माझ्या लग्नासाठी योग्य वर शोधून देतो,’ असे सांगून शिर्डीत आणून लॉजवर बलात्कार केला. नंतर अश्‍लील फोटो ई-मेल केले. गेल्या आठ वर्षांपासून गुहे याने ब्लॅकमेल करून बलात्कार केला.

Web Title: rape crime