अल्पवयीन मुलीवर गुंड दत्ताकडून बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

सातारा - "मोका' कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेला प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव याच्यावर 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणे, तसेच गर्भपात केल्याप्रकरणी "पोक्‍सो' कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये दत्ता जाधववर "मोका' कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जत येथील प्रतापपूरमध्ये पोलिस पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रतापसिंहनगरात घुसून दत्ता जाधवला ताब्यात घेतले. दत्ताच्या अटकेनंतर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. भुईंज येथील भंगार व्यवसायिकाच्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 

काल (ता. 30) रात्री आणखी एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दत्ताविरुद्ध दाखल झाला. "मला तुझी मुलगी आवडते, ती मला दे, अन्यथा दुसऱ्या कुणाला देऊ देणार नाही, आयुष्य बरबाद करीन, जीवे मारीन' अशी धमकी तो माझ्या आईला देत होता. शाळेत जाताना मला अडवून बोलायचा प्रयत्न करायचा. एक डिसेंबर 2017 रोजी तो मला व आईला कपडे खरेदीसाठी म्हणून पुण्याला  घेऊन गेला. तेथील लॉजवर मला नेले. तेथे तीन वेळा अत्याचार केले. त्यानंतरही त्याचे अत्याचार सुरूच होते. त्यामुळे मी गर्भवती राहिले. त्यानंतर त्याने गर्भपात करायला लावले, असे संबंधित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर तपास करत आहेत.

Web Title: Rape on minor girl