राधानगरी चिंब... धरणे ओसंडून... नद्या पात्राबाहेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

राशिवडे बुद्रुक - पावसामुळे राधानगरी तालुका चिंब झाला आहे. येथील तिनही धरणे ओसांडून वाहू लागली असून, भोगावती, दुधगंगा व तुळशी नद्यांना पुरस्थीती निर्माण झाली आहे. भोगावती नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. राधानगरीचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे. नदीकाठावरील पिके धोक्‍यात आली आहेत. 

राशिवडे बुद्रुक - पावसामुळे राधानगरी तालुका चिंब झाला आहे. येथील तिनही धरणे ओसांडून वाहू लागली असून, भोगावती, दुधगंगा व तुळशी नद्यांना पुरस्थीती निर्माण झाली आहे. भोगावती नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. राधानगरीचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे. नदीकाठावरील पिके धोक्‍यात आली आहेत. 

तालुक्‍यात गेले चार दिवस संततधार सुरु आहे. यामुळे आधीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात पाणी येऊ लागल्याने राधानगरी, तुळशी व काळम्मावाडी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. या तिनही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने भोगावती, तुळशी व दुधगंगा नद्यांना पुर येऊ लागला आहे. भोगावती नदीवरील तारळे, शिरगाव बंधारे पाण्याखाली गेल्यास दळणवळण विस्कळीत होणार आहे. आज रात्रीनंतर यावरून पाहतूक बंद होण्याची शक्‍यता आहे. आजही पावसाचा जोर कायम राहिला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्याकडे अभियंत्यांचे लक्ष आहे. नद्यांच्या काठावर असलेल्या व सध्या पोटरीतून बाहेर पडलेल्या भात पिकाला याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. यंदा मोठा पूरच न आल्याने पिकस्थिती चांगली होती; मात्र आताच्या  पुराचे पाणी पिकात शिरल्यात हातचे पीक जाण्याची भीती आहे. 

सोमवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले झाले होते. आज सकाळपासून पुन्हा जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने सातही दरवाजे खुले झाले. या सर्व दरवाज्यांमधून १०५०० क्‍यूसेक व विज निर्मीतीसाठी २२०० क्‍यूसेक असे १२७०० क्‍यूसेक पाणी भोगावती नदीच्या पात्रात शिरत आहे, तर काळम्मावाडी धरण परिसरातही पाऊस असल्याने आज सकाळी ५५०० क्‍यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला. पैकी ४६०० सांडव्यातून व ९०० क्‍यूसेक विजनिर्मीतीसाठी सुरु होता. सायंकाळपर्यंत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने यामध्ये वाढ केली असून, सांडव्यातून ६१०० क्‍यूसेक विसर्ग दुधगंगेच्या पात्रात सुरु आहे. तुळशी धरणातूनही ६३२ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने या तिनही नद्या सध्या पात्राबाहेरून वाहात आहेत. पावसाचा जोर वाढल्यास यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राधानगरीतील दुधगंगा धरणातून सध्या ७००० क्‍यूसेक, राधानगरीतून १२७०० तर तुळशी धरणातून ६३२ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तिनही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोविस तासात सरासरी सत्तर मिलीमिटरच्या वर पावसाची नोंद झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: rashiwade budruk news radhanagari dam full