सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र; सूर्यवंशीच्या धक्‍क्‍याने भाजप गोत्यात

ncp_congress
ncp_congress

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आत्तापासून शेवटचे तीन तास उरले असताना सर्वपक्षिय उमेदवार याद्यांचा घोळ मिटता मिटेना अशी स्थिती आहे. काल मध्यरात्रीनंतर राजकीय हालचाली गतीमान होऊन भाजपला जोरदार धक्के बसले आहेत. त्यात सांगलीतील दिलिप सूर्यवंशी गट, महेंद्र सावंत गटाने भाजपला राम राम करीत राष्ट्रवादीशी जवळीक केली आहे. कॉंग्रेसचे महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार नाराज झाले असून त्यांनी आघाडीला कट्टयावर बसवून नवी समीकरणे जुळतात का याची चाचपणी सुरु केली आहे.

येत्या 1 ऑगस्टला महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. त्यासाठी काल रात्रीपासून सर्व पक्षीय नेत्यांची खलबते सुरु होती. ती पहाटेपर्यंत सुरुच होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवताना दोन्हीकडील नेत्यांनी इच्छुकांनाच नव्हे तर भाजप नेत्यांनाही गॅसवर ठेवले आहे. सर्वच इच्छुकांना अर्ज भरा असे सांगत नेत्यांनी आपले पत्ते खुले केले नाहीत. त्यामुळे आज सकाळपासून अर्ज भरण्यासाठी सर्वच केंद्रावर अक्षरक्षः रांगा लागल्या होत्या. 

सूर्यवंशी राष्ट्रवादीत? 
गतीमान राजकीय हालचालीमध्ये गेले काही दिवस भाजपच्या पोस्टरवर झळकणारे दिलिप सूर्यवंशी यांनी अचानकपणे यु टर्न घेत राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्याची चर्चा आहेत. नेते जयंत पाटील यांनी सूर्यवंशी यांना आश्‍वस्त करीत पहाटे ही मोहिम फत्ते केल्याची चर्चा आहे. या घडामोडीमुळे भाजपला सांगली व कुपवाड शहरात मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com