कोकणातील धूपप्रतिबंधक 105 प्रजाती नष्ट 

कोकणातील धूपप्रतिबंधक 105 प्रजाती नष्ट 

गुहागर - लाटांच्या तडाख्यापासून किनार्‍याचे संरक्षण हे निसर्गनिर्मित सैनिक करत होते. मात्र गेल्या काही वर्षात छोटी झुडपे, वेली नष्ट होऊ लागल्याने समुद्राच्या लाटांमुळे वाळूची धूप होते. कोकणातील समुद्रकिनार्‍यांवर सुमारे 350 जातीच्या वनस्पती होत्या. वाळूत खोलवर जाणार्‍या तंतूमय मुळांद्वारे या वनस्पती वाळूची धूप थांबवत होत्या. यापैकी जवळपास 105 प्रजाती नष्ट झाल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा 2016 चा अहवाल सांगतो.  

25 वर्षांपूर्वी गुहागरच्या समुद्रकिनार्‍याची सुरवात नारळ पोफळीची बागेनंतर पुर्ननवा, मार्वेल, रानमोडी, रानकांडा, केवडा आदी छोट्या वनस्पतींनी आच्छादलेला वाळुचा डुंगा (छोटा डोंगर) नंतर प्रत्यक्ष किनारा अशी होती. 

गेल्या काही वर्षात किनार्‍यावर बसून सूर्यास्त पाहण्यासाठी, पर्यटकांच्या निवासासाठी केलेले बांधकाम.अतिक्रमण करुन लावलेली नारळ पोफळीची झाडे, बागेसमोरील रानाची अज्ञानातून केलेली बेणणी, घरातील रद्दी, तुटक्या फुटक्या जुन्या वस्तू, प्लास्टिक, बागेतील कचरा,  डुंग्यावर जाळून टाकण्याची सवय आदी कारणांमुळे वाळूच्या डुंग्यावरील वनस्पती नष्ट होत आहेत. 

आजही गुहागरच्या विस्तीर्ण किनार्‍यावर वेली, झुडपे असलेल्या ठिकाणी वाळुचा डुंगा अस्तित्वात आहे. उधाणाच्या लाटा येऊनही त्या परिसरातील वाळूची धुप झालेली नाही. 

किनार्‍यांच्या या सैनिकांचे संवर्धन आणि संरक्षण केले तर गुहागरचा समुद्रकिनारा नष्ट होणार नाही. ट्रायपॉडची आवश्यकताही भासणार नाही. 

वाळ्याची लागवड माती, वाळूची धूप थांबवते. परदेशातही धूपप्रतिबंधक म्हणून वाळ्याचा वापर केला जातो. कोकणात वाळा, चहाची पात यांची लागवड खर्चाविना होते. मात्र निसर्गनिर्मित संरक्षण व्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.

- प्रसाद भावे, शेतकरी बुरंबी, ता. संगमेश्वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com