उस उत्पादकाला जादा दर देण्याचे प्रतिपादन

उस उत्पादकाला जादा दर देण्याचे प्रतिपादन

मंगळवेढा : साखर कारखानदारीत चालू वर्षी केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरातही वाढ केली. फॅबटेक कारखान्याकडेही डिस्टिलरी प्रकल्प असल्याने त्याचा लाभ ऊस उत्पादकाला जादा दर देण्यासाठी होणार असल्याचे प्रतिपादन दामाजी शुगरचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.

नंदुर येथील फॅबटेक साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम 2018-19 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर, दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे व युवा उद्योजक संजय आवताडे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सत्यनारायण व नवग्रहांची पूजा लताताई व चनबसु येणपे, कमलाताई व दत्तात्रय गायकवाड, मीनाक्षी व रावसाहेब राजमाने, संगीता व प्रकाश कोरे, राणी व केशव पडोळकर शेतकऱ्यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले, फॅबटेक कारखान्याचे गतवर्षीचे कमी कालावधीमध्ये जास्त गाळप केले यात कामगारांची भूमिका महत्वाची ठरली. चालू गळीत हंगाम ही गतवर्षीप्रमाणेच योग्य नियोजन करून कामगार, शेतकरी व वाहतूक ठेकेदार यांच्या मदतीने कमी कालावधीत ठेवलेले अपेक्षित गाळप पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर म्हणाले की गतवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फॅबटेक कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस दिला त्याच विश्वासाने याही वर्षी ऊस घालवण्याचे आवाहन करून   इतर कारखान्यांच्या स्पर्धेत राहून त्यांचे बरोबरीने ऊस दर देण्यास आम्ही बांधील राहू, चालू गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यावेळी कार्यकारी संचालक मोहन पिसे, परमेश्वर येणपे, शिवयोग्याप्पा पुजारी, विजय माने, पप्पू काकेकर, लक्ष्मण मस्के, चीफ इंजिनिअर किशोर फरांदे, चीफ केमिस्ट चंद्रकांत विभुते, ऊस विकास अधिकारी, रामदास शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी उत्तम ढेरे  व दशरथ रोकडे, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, असवानी प्रमुख विजयकुमार पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर कृष्णा शेळके, प्रोजेक्ट इंजिनिअर संजय अदाटे, असि. एच.आर. मॅनेंजर ज्ञानेश्वर बळवंतराव, सह कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अर्जुन मासाळ यांनी केले तर आभार सचिन मळगे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com