मोठ्या स्वप्नांचा छोटा दर्यावर्दी (रायझिंग स्टार्स)

विजय वेदपाठक
गुरुवार, 9 मार्च 2017

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याने नौकानयनाला सुरवात केली. दहाव्या वर्षी त्याने बारा वर्षाखालील गटात बक्षिसे मिळविण्यास सुरवात केली. त्याच वेळी तो खुल्या गटातही एक्का बोटीने तो आव्हान देऊ लागला होता. समुद्राशी भिडण्याचे त्याचे कौशल्य पाहून अनेकांना कौतुक वाटत असे. जगात नौकानयनातील सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याची नोंद आहे. आशियाई स्पर्धेत त्याने वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच चमकदार कामगिरी केली. ही गोष्ट नव्हे, वास्तवातील यश आहे, तमिळूनाडूच्या चित्रेश तथा या युवा खेळाडूचे. नौकानयनातील भारतीयांचे स्वप्न म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आहे. 

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याने नौकानयनाला सुरवात केली. दहाव्या वर्षी त्याने बारा वर्षाखालील गटात बक्षिसे मिळविण्यास सुरवात केली. त्याच वेळी तो खुल्या गटातही एक्का बोटीने तो आव्हान देऊ लागला होता. समुद्राशी भिडण्याचे त्याचे कौशल्य पाहून अनेकांना कौतुक वाटत असे. जगात नौकानयनातील सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याची नोंद आहे. आशियाई स्पर्धेत त्याने वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच चमकदार कामगिरी केली. ही गोष्ट नव्हे, वास्तवातील यश आहे, तमिळूनाडूच्या चित्रेश तथा या युवा खेळाडूचे. नौकानयनातील भारतीयांचे स्वप्न म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आहे. 
शाळकरी मुले गणिताचा अभ्यास करीत होते तेव्हा चित्रेश नौकानयनात रमला होता. त्याची मोठी बहीण मेघना हिच्याकडून त्याने याची प्रेरणा घेतली आहे. ती उत्तम नौकानयनपटू आहे. चेन्नईपासून जवळच असलेल्या किलपऊक या गावातून चित्रेशचा प्रवास सुरू झालेला आहे. तेथील राजाजी विद्याश्रमचा तो विद्यार्थी आहे. होतकरू गटात त्याची ख्याती झाली आहे. लहान वयातच त्याने आयर्लंड, फ्रान्स, ब्रिटन, मलेशिया, तुर्की, नेदरलॅंडस्‌, बहारीन, माल्टा आदी देशातील स्पर्धेत आपली कामगिरी नोंदविली आहे. अनेकदा लहान असूनही तो स्पर्धेसाठी एकटाच जायचा. त्याचे वय पाहून तेथील स्पर्धक, संयोजन समिती अगदी पालकांच्या भूमिकेतून जाऊन त्याची काळजी घ्यायची. समुद्राला अंगावर घेणारा छोटा वीर अशी त्याची अल्पावधीच ओळख झाली. 
होतकरू गटात तो छोटी नौका वापरायचा. एकट्या माणसाने चालविणारी ही छोटी पंधरा वर्षाखालील खेळाडूंसाठी वापरली जाते. हा प्रकार तसा जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात नोंदणीकृत अशा दीड लाखांवर नौका आहेत. बारा वर्षाखालील गटात त्याने 2015 मध्ये भारतीय नौकानयक स्पर्धेत सुवर्ण पटकावले. सलग सहा महिने तो सरावामुळे शाळेला जाऊ शकला नव्हता. सहा महिने त्याने अतिशय खडतर सराव केला होता. न चुकता दररोज सहा तास तो खुल्या समुद्रात आपली कौशल्ये घोटीत होता. तो एका मुलाखतीत म्हणतो, माझे शिक्षक खूप प्रेमळ आहेत. त्यामुळे मी शाळा बुडवून सरावासाठी वेळ देऊ शकतो. नौकानयनावर लक्ष केंद्रित करू शकतो. अनेकदा शिक्षक घरीच येऊन विषय समजावून देतात. 
आशियाई स्पर्धांसाठी विशाखापट्टणम्‌ येथे 2014 मध्ये झालेल्या भारतीय संघ निवड चाचणीच्या पंधरा पैकी आठ प्रकारात चित्रेश विजेता होता. उर्वरित सात प्रकारांत तो पहिल्या पाच क्रमांकामध्ये होता. तो अतिशय आत्मविश्‍वासू खेळाडू आहे. आशियाई स्पर्धेची खडतर तयारी करताना त्याच्याकडे पदक जिंकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती होती. 
आशियाई स्पर्धेसाठी तो पोहोचला तेव्हा त्याचे वय पाहून अनेक खेळाडूंनी, अगदी भारतीयसुद्धा, तू कोणाबरोबर आला आहेस इथे, तुला काय मदत हवी आहे काय, अशी चौकशी केली होती. त्यांना समजले की, प्रेक्षक नाही तर स्पर्धेतील एक छोटा आव्हानवीर आहे, तेव्हा त्यांच्याही आश्‍चर्याला पारावार राहिला नाही. वयाच्या बाराव्या वर्षी आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंग्यासह सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. एक्का बोट शर्यत पूर्ण करणारा (One Person Dinghy) तो सर्वात लहान खेळाडू ठरला. हा प्रकार ऑलिम्पिकमधील विविध प्रकारातील पायाभरणी समजला जातो. आशियाई स्पर्धेत तो सहभागी झाला तेव्हा तो अवघ्या 12 वर्षांचा होता. 
चित्रेशने वयाच्या सहाव्या वर्षी या प्रकारातील नौकांवर सराव सुरू केला होता. त्याला बोट हातळण्याचे उपजत ज्ञान असल्यासारखे त्याचे प्रभुत्व आहे. अशा प्रकाराची बोट समुद्रात खोलवर नेऊन वाऱ्याशी खेळत चालविणे म्हणजे मोठे आव्हान असते. त्यासाठी कमालीचे बळ आणि बुद्धी लागते. आशियाई स्पर्धेचा मोठा अनुभव त्याच्या गाठीशी आला आहे. भारताला एक पदक विजेता खेळाडू भविष्यात मिळू शकतो, असे भारतीय नौकानयन प्रशिक्षक पीटर कॉनवे यांनी एका मुलाखतीदरम्यान चित्रेशबद्दल म्हटले होते. कॉनवे जगप्रसिद्ध नौकानयनपटू असून ते चित्रेशला 2009 पासून प्रशिक्षण देत आहेत. अनुभवासाठी स्पर्धेतील अनेक देशात लहान वयातच गेलेल्या चित्रेश एका मुलाखतीत म्हणतो, मला खेड्यातच आवडते. पण मोठी स्पर्धा शहरातच होते. सर्व ठिकाणे सारखीच वाटतात. त्यामुळे थोडे गोंधळल्यासारखे होते. स्पर्धेला गेल्यावर तो बहुतांश वेळ आपल्या पथकात किंवा दुसरे प्रशिक्षक उमेश नाईकसथम्‌ यांच्यासोबत घालवितो. 
चित्रेशने 2012 मध्ये कोचीनमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात तिसरा तर खुल्या गटात नववा आला. पुढील वर्षी हीच स्पर्धा मुंबईत झाली. तेथे तो वयोगटात दुसरा तर खुल्या गटात पाचवा आला. 2013 च्या जुलैमध्ये हैदराबादमध्ये झालेल्या पावसाळी स्पर्धेत त्याने वयोगटाचे विजेतेपद तर खुल्या गटाचे उपविजेतेपद पकाविले. याचवर्षी चैन्नईत इंडियन इंटरनॅशनल स्पर्धा झाली. वयोगटातील विजेतेपदासह तो खुल्या गटात चौथा आला. 2014 मध्ये कामगिरीत 2016 मध्ये आशियाई स्पर्धा जिंकली. 2014 मध्ये त्याने आशियाई निवड चाचणी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे.