सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात काेसळली दरड

संदीप गाढवे
रविवार, 16 जुलै 2017

सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात दरड काेसळली. दुपारी चारपासून या भागातून महाबळेश्वरकडे जाणारी संपुर्ण वाहतुक बंद आहे

केळघर : सातारा परिसरात गेले दाेन दिवस जाेरदार पाऊस काेसळत आहे. यामुळे आज (रविवार) सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात दरड काेसळली.

दुपारी चारपासून या भागातून महाबळेश्वरकडे जाणारी संपुर्ण वाहतुक बंद आहे. यामुळे दाेन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तहसिलदार राेहिणी आखाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दगड हटविण्याच्या सूचना केल्या आहेत.