टेंभू'साठी 1283 कोटीचा अद्यादेश आठवडाभरात- संजय पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मिरज : कृष्णा खोरे मिळाल्याने सिंचन योजनांना निधी कमी पडणार नाही. "म्हैसाळ"ला केंद्राकडून 2 हजार 92 कोटी रुपये मिळाले आहेत. टेंभूला "बळीराजा' योजनेतून 1 हजार 283 कोटी रुपये मिळतील. याबाबतचा अध्यादेश आठ-दहा दिवसांत निघेल, अशी माहीती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, खासदार संजय पाटील यांनी दिली. 
मिरज पंचायत समितीच्या नूतणीकरण केलेल्या वसंतदादा पाटील सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सभापती जनाबाई पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अरुण राजमाने उपस्थित होते. 

खासदार पाटील म्हणाले, "सिंचन योजनांच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. म्हैसाळ योजनेच्या नरवाड आणि आरग पंपगृहांत भोवऱ्यांमुळे पूर्ण क्षमतेने पंप चालत नव्हते. किर्लोस्करच्या तंज्ञांकडून दुरुस्तीनंतर 85 टक्के कार्यक्षमता वाढलीय. गळती, दुरुस्ती, जुने पंप यावरही काम होईल. ग्रामपंचायतींना निधी वाढला असून पंचायत समितीचे आर्थिक अधिकार कमी झाले. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यावर चर्चा करून. महापालिकेसाठी लवकरच बैठक घेणार आहे. त्यावेळी मंत्री नितीन गडकरींनी ड्रायपोर्ट, रस्त्यांसाठी चांगला निधी दिला यासाठी त्यांचाही सत्कार करायचा आहे."

आमदार खाडे म्हणाले, "कॉंग्रेसच्या काळात जुने झालेले सभागृह आता नवे झाले. अच्छे दिन आले. खासदारांना महामंडळ मिळाल्याने पाण्यासाठीचे माझ्या डोक्‍यावरील टेन्शन कमी झाले. घरचा जिल्हा म्हणून सांगलीकडे जास्त लक्ष द्यावे.'' तर "सभागृह चांगले झाले आहे; आता कामकाजही चांगले व्हावे.'' असे 
आमदार गाडगीळ म्हणाले.

यावेळी उपसभापती काकासाहेब धामणे, उद्योजक भालचंद्र पाटील, किरण सूर्यवंशी, गजेंद्र कुल्लोळी, अरविंद तांबवेकर आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी राहूल रोकडे, कक्ष अधिकारी संजय शिंदे, उपअभियंता उमेश राऊत, शाखा अभियंता मुकुंद माळी आदींनी संयोजन केले. 

राजकारण बारमाही नको 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या दहा सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील व मोहनराव कदम यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत न घातल्याने नाराज होते. त्याची नोंद घेत खासदार पाटील म्हणाले, "राजकारण फक्त निवडणुकीपुरते राहीले पाहीजे. चांगल्या कामांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.'' 

Web Title: Rs. 1283 crores order for during the week - Sanjay Patil