मराठ्यांना नव्हे, आरएसएसला घडवायची होती दंगल...

nagar
nagar

नगर : पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील जाणीवपुर्वक बदनाम करत आहेत. मराठा अंदोलनकर्त्यांना नव्हे तर "आरएसएस' च्या लोकांनाच पंढरपुरात दंगल
करुन मराठा समाजाला बदनाम करायचे होते. त्यासाठी "आरएसएस' चे पाचशे लोक पंढरपुरात घुसले होते, संभाजी ब्रिगेडने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असा गंभीर आरोपही मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरु असलेल्या अरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर आज मनोज आखरे यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडली.
प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, कोपर्डीचे बबन सुद्रीक, राजेश परकाळे,
संगिता चौधरी, दिलीप वाळुंज, टिळक भोस, युवराज चिकलठाणे, अच्युत गाडे, शुभम काकडे, राजेंद्र राऊत यांच्यासह यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. आखरे म्हणाले, "शांततेत मोर्चे काढून हाती काहीच मिळत नसल्याने
समाजाच्या भावना आता अधिक तीव्र होत आहेत. कायगाव टाका येथे हुतात्मा झालेला काकासाहेब शिंदे हे तेथील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्षाचे बंधू आहेत. मराठा समाज अंदोलन कर्त्यांना पंढरपुरात दंगल करायची होती असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. मुळात अांदोलनकर्त्यांना नव्हे, आरएसएसच्या लोकांनाच हे करायचे होते. गर्दीत साप सोडणे, दंगल घडवणे अशी विकृती संघाचे लोकच करु शकतात. संभाजी ब्रिगेडला ही माहिती मिळाल्यावर ब्रिगेडच्या सुमारे 22 टीम पंढरपुरात दाखल करुन संघाचा हा प्रयत्न हाणून पाडला. वारकरी, कष्टकरी, आणि आमची संस्कृती हा घाण प्रकार करणार नाहीत.

राज्यात लोकांमध्ये उद्रेक आहे. त्यामुळे राज्यपाल, पंतप्रधानांनी त्यात
लक्ष घालून हे अंदोलन थांबवावे. अशीच परिस्थिती राहिली, अंदोलन हाताबाहेर गेले तर लोकांना अवारणेही कठीण होईल. सरकारने ठरले तर आठ दिवसात आरक्षणाचा प्रश्‍न सुटू शकतो. 1 ऑगस्टपर्यत निर्णय झाला नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून अदोलनाची तीव्रता अधिक वाढणार आहे. समाजाची अस्मिता असेल तर मराठा आमदारांनी राजीनामे देऊन अंदोलनात सहभागी व्हावे. सरकारने खोटे गुन्हे दाखल करुन अंदोलन दडपण्याचे काम थांबवावे. अंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक कोटीची मदत देऊन हुतात्मा जाहीर करावे.''

मुख्यमंत्र्यांना अटक करा
"मराठा समाजाने शांततेत लाखोंचे मोर्चे काढले; पण सरकारने मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आताचे उद्रेकी अंदोलन होत आहे. अंदोलनातून बळी गेले त्याला मुख्यमंत्री जबाबदार असून मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. चंद्रकांत पाटील व अन्य काही लोकांनी समाजाची दिशाभूल थांबवावी. आणि मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल हे पहावे असे मनोज आखरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com