साईचरणी 50 दिवसांत 31 कोटींचे दान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

शिर्डी : नोटाबंदीनंतरच्या पन्नास दिवसांत साईबाबा मंदिरातील दानपेटीतील रकमेत मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्‍क्‍यांनी घट झाली. मात्र, ऑनलाइन देणगीत दुपटीने वाढ झाली. डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे दोन कोटी 62 लाख रुपये जमा झाले. बंद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर दानपेटीत टाकल्या जातील, हा अंदाज फोल ठरला. या कालावधीत साईबाबांच्या दानपेटीत एकूण 31 कोटी 73 लाख रुपयांचे दान अर्पण झाले.

पन्नास दिवसांत जमा झालेल्या एकूण दानामध्ये 73 लाख रुपये किमतीच्या दोन किलो 909 ग्रॅम वजनाचे सोने व 18 लाख रुपये किमतीचे 56 किलो 517 ग्रॅम वजनाच्या चांदीचा समावेश आहे. देणगी कक्षात चार कोटी 25 लाख रुपये, चेक व डीडीद्वारे तीन कोटी 96 लाख रुपये व मनी ऑर्डरद्वारे 35 लाख रुपये देणगी जमा झाली. नोटाबंदीच्या कालावधीत दानपेटीतील रक्कम दररोज मोजून बॅंकेत जमा केली जात आहे.

सशुल्क साईदर्शनातून तीन कोटी 18 लाख
सशुल्क साईदर्शन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय विश्‍वस्त मंडळाने घेतला. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल 40 टक्के वाढ झाली. पन्नास दिवसांत केवळ सशुल्क साईदर्शनातून साईसंस्थानाला तीन कोटी 18 लाख रुपये प्राप्त झाल्याची माहिती विश्‍वस्त सचिन तांबे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर...

03.21 PM

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी...

01.00 PM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017