‘सकाळ’च्या प्रदर्शनातून अर्थकारणाला गती - संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सातारा - साताऱ्यात आर्थिक गती आणण्याचे काम ‘सकाळ’च्या ऑटो-प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या माध्यमातून होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला. माध्यमांच्या कामाच्या कक्षा रुंदावत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘सकाळ’ राबवत असलेले विविध उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सातारा - साताऱ्यात आर्थिक गती आणण्याचे काम ‘सकाळ’च्या ऑटो-प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या माध्यमातून होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला. माध्यमांच्या कामाच्या कक्षा रुंदावत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘सकाळ’ राबवत असलेले विविध उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या ऑटो-प्रॉपर्टी एक्‍स्पोचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, स्टेट बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक राजीव रंजन प्रसाद, ‘एक्‍स्पो’चे सहप्रायोजक प्रमिता व्हेंचर्सचे संचालक संतोष यादव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन झाले. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘अशा प्रकाराचे उपक्रम मुंबई-पुण्यामध्ये कायम होतात. परंतु, साताऱ्यात उद्योगांच्या उभारीसाठी पाठबळ देणे आवश्‍यक आहे. ते काम ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे साताऱ्यात आर्थिक गती आणण्यास मदत होईल. सध्याच्या वातावरणात माध्यमांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित होत असताना सामाजिक बांधिलकीतून ‘तनिष्का’, ‘यिन’, ‘महान राष्ट्र नेटवर्क’ असे विविध उपक्रम ‘सकाळ’ राबवत आहे. त्यातून माध्यमे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संवाद कमी झाला आहे. प्रशासन, शासन तसेच इतर घटकांशी जनतेला जोडण्यासाठी ‘सकाळ’ अत्यंत महत्त्वाचे असे पुलाचे काम करत आहेत. त्यातून सर्वसामान्यांचा जीवनस्तर नक्कीच उंचावेल. सातारकरांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा.’’
‘सकाळ’ने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले. ‘तनिष्का’, ‘यिन’, ‘कृष्णा स्वच्छता मोहीम’, जलसंवर्धनात ‘सकाळ’ बजावत असलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राजीव रंजन यांनी केले. ‘एक्‍स्पो’च्या माध्यमातून वाहने व घरांची माहिती, कर्ज सुविधा हे सर्व एकाच व्यासपीठावर ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिले आहे. त्याचा सातारकरांनी लाभ घेण्यासाठी एकवेळ प्रदर्शनाला अवश्‍य भेट द्यावी, असे आवाहन श्रीराम पवार यांनी केले. 

या वेळी सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, उपवृत्तसंपादक राजेश सोळसकर, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम, उपव्यवस्थापक मेल्वीन डिमेलो, इव्हेन्ट व्यवस्थापक राहुल पवार तसेच विविध स्टॉल्सचे मालक व कर्मचारी उपस्थित होते.

सहभागी ऑटो डीलर्स
राज मोटर्स सातारा, सम्राट मोटर्स सातारा, कणसे ऑटोलाईन्स सातारा, कणसे ऑटोव्हील्स सातारा, चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि. सातारा, सह्याद्री मोटर्स सातारा, ट्रीनिटी मोटर्स पुणे, गजानन ऑटोमोटिव्ह प्रा. लि. सातारा, कणसे ऑटो वर्ल्ड सातारा, कृष्णा ऑटोलिंक सातारा, क्रिस्टल होंडा सातारा, श्राईन ऑटो प्रा. लि. सातारा.

सहभागी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, प्रमिता व्हेंचर्स-बिल्डर्स अँड प्रमोटर्स, सुजित जगधने अँड असोसिएट्‌स, ग्रीन सिटी, पुष्प डेव्हलपर्स, राज बिल्डकॉन, आदर्श ग्रुप, अवधूत व्हिलेज, हिरा बिल्डकॉन, नोबल सागर रेसिडेन्सी, कासा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, वरद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सौ. कविता अँड राजेंद्र चोरगे असोसिएट्‌स, साईरंग डेव्हलपर्स पुणे, हेरंब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नंदनवन, आर्या डेव्हलपर्स, अर्जुन डेव्हलपर्स, फिनिक्‍स एजन्सीज, फिनिक्‍स सोलर सिस्टिम्स प्रा. लि., जीएसएम वर्ल्ड ऑफ प्युरिफायर्स, सुदर्शन सोलर, ॲपल किचन डिझाइन.

‘एक्‍स्पो’च्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर... 

  • प्रमिता व्हेंचर्स - सर्व्हिस टॅक्‍स, व्हॅट माफ व प्रदर्शनातील बुकिंगवर विशेष सूट.
  • ग्रीन सिटी - व्हॅट, रजिस्ट्रेशन शुल्कामध्ये भरघोस सूट.
  • पुष्प डेव्हलपर्स - व्हॅट माफ.
  • राज बिल्डकॉन - सर्व्हिस टॅक्‍स, व्हॅट माफ.
  • अवधूत व्हिलेज - प्लॉट बुकिंगवर स्टॅंप ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ. फर्निश फ्लॅट २,७०० रुपये प्रति स्क्‍वेअर फूट.  
  • सौ. कविता अँड राजेंद्र चोरगे असोसिएट्‌स - प्लॉटवर विशेष सूट.
  • आर्या डेव्हलपर्स - प्रदर्शनातील बुकिंगवेळी वन बीएचके फ्लॅट फक्त १३ लाख रुपयांत, टू बीएचके फ्लॅट १६.५ लाख रुपयांत, सर्व खर्चासहित.