पायलट ट्रेनिंगसाठी उद्योगपती संजय घोडावत अमेरिकेला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत पायलट ट्रेनिंगसाठी अमेरिकेला रवाना झाले. याआधी पायलट परीक्षेत ते उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील फ्लाईंग स्कूलमध्ये ट्रेनिंग होणार असून यानंतर त्यांना इंटरनॅशनल प्रायव्हेट पायलट परवाना मिळणार आहे. स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे ते भारतातील तिसरे पायलट असणार आहेत. 

जयसिंगपूर : घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत पायलट ट्रेनिंगसाठी अमेरिकेला रवाना झाले. याआधी पायलट परीक्षेत ते उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील फ्लाईंग स्कूलमध्ये ट्रेनिंग होणार असून यानंतर त्यांना इंटरनॅशनल प्रायव्हेट पायलट परवाना मिळणार आहे. स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे ते भारतातील तिसरे पायलट असणार आहेत. 

पन्नाशीनंतरही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. श्री. घोडावत यांनी औद्योगिक क्षेत्रात तीस वर्षे विविध कंपन्यांचे नेतृत्व करुन आघाडीचे उद्योगपती म्हणून लौकीक मिळवला आहे. ते स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. संजय घोडावत विद्यापीठाच्या माध्यमातून देश-विदेश पातळीवरील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यांनी जवळपास आठ हजाराहून अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. 
बारा हजाराहून अधिक विद्यार्थी याठिकाणी शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे. संजय घोडावत ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी घोडावत एटंरप्रायझेस या हवाई वाहतूक कंपनीची उभारणी केली आहे. घोडावत ग्रुपतर्फे लवकरच बेळगावमधून हवाई सेवेचा शुभारंभ करण्याचा मानस आहे.