हमीभाव केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी - समाधान आवताडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : दुष्काळी तालुक्यातील तुर, मका उत्पादकांना शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रातुन जादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असल्याने या केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी असे आवाहन दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 

मंगळवेढा (सोलापूर) : दुष्काळी तालुक्यातील तुर, मका उत्पादकांना शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रातुन जादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असल्याने या केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी असे आवाहन दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 

मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ बबनराव आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी समाधान आवताडे हे होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, सभापती प्रदीप खांडेकर, नाफेडचे अमोल गुरव, दामाजीचे संचालक सचिन शिवशरण, राजेन्द्र पाटील सुरेश भाकरे, सचिव सचिन देशमुख, राजाभाऊं चेळेकर, केशव आवताडे, सत्यजित सुरवसे, अजिम शेख, दत्तात्रय करे, राजाराम कालीबाग, फटेे, तालुक्यातील शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आवताडे म्हणाले की, चालू वर्षी 671 शेतकऱ्यांचा 7147.5 क्विंटल तर मका 14184 क्किंटल खरेदी करून खरेदी केलेल्या मक्याचे 6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सध्या 4400 हमीभावा प्रमाणे 850 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून या खरेदी केंद्रावर तालुक्यासह, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे मोबाईलवर मेसेज मिळताच शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे आवाहन आवताडे यांनी केले. यावेळी प्रास्ताविक गजानन पवार यानी केले तर आभार अशोक उन्हाळे  यांनी मानले.

Web Title: sale Gram at minimum support price center said by samadhan awatade