संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे एटीएम फोडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

आश्वी : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखे शेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी (ता. 12) पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले.

वडगाव पान येथील सेवा सहकारी संस्थेच्या मालकीच्या गाळ्यात इंडिया एटीएम कंपनीचे एटीएम मशिन आहे. गुरूवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम केंद्रात जाऊन तेथील मशिन बाहेर आणले. त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनात ते एटीएम मशिन टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फार जड असल्याने केंद्राच्या परिसरातच टाकून पोबारा केला. या एटीएम मशिनमधून नक्की किती रक्कम चोरीला गेली ते अद्याप समजू शकले नाही. हे एटीएम. फोडण्याची ही तिसरी वेळ आहे.

जिल्हा बँकेच्या सुरक्षा रक्षकाला गस्त घालताना एटीएम केंद्र फोडल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ ही बाब संगमनेर येथील ग्रामीण पोलिस ठाण्यास कळविली. संगमनेर ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व सहायक निरीक्षक शिवाजी पाळंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अद्याप याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये गुन्हेगार कैद झालेले आहेत. हे फुटेज पोलिसांच्या हाती आल्यानंतरच, आरोपींचे धागेदोरे हाती लागण्यासाठी महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: In the Sangamner taluka the ATM robbery