30 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात संघर्ष मेळाव्याचे आयोजन

30 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात संघर्ष मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढा - अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने समाजातील विविध रखडलेल्या प्रश्नासाठी 30 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर भंडगे यांनी दिली.

येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणाय्रा  होलार समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सुटावेत या करीता होलार समाज अभ्यास गटाऐवजी आभ्यास आयोग नेमावा, होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरूस्त व्हाव्यात, अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13 टक्के आरक्षणाचे व्ही.जे.एन.टीप्रमाणे अ.ब.क ड करून त्यामध्ये होलार समाजाला स्वतंत्र तीन टक्के आरक्षण मिळावे, होलार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळामध्ये असणार्‍या भांडवलामधून होलार समाजाला स्तवंत्र 25 टक्के भांडवलाची तरतूद करावी, प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेतून मिळणार्‍या घरकूलासाठी जागा उपलब्ध करून देणे व शासनाकडील महसूल वनविभाग, गायरान, व पडीक जमिन या विना अट कसण्यास मिळाव्यात, असे अनेक प्रश्नांची सोडवणूक होणेसाठी या मेळाव्याचे आयोजन केले अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर असून मा.केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आ.भारत भालके, प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,प्रा.शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड.एकनाथ जावीर, प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार, मधुकर भंडगे, हैदर केंगार हे उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com