सांगलीच्या औषध वितरकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मिरज - म्हैसाळ (ता. मिरज) येथे झालेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडातील औषध विक्रेत्यांची भूमिका पोलिसांनी महत्त्वाची मानली आहे. त्याला अनुसरून सांगलीतील औषध वितरक भरत शोभाचंद गटागटला पोलिसांनी आज अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. डॉ. खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या सुनील खेडेकर या औषध विक्रेत्याकडील कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे त्याचा उलगडा झाला. खेडेकरकडील तपासात गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाच्या विक्रेत्यांची नावे, त्यांची व्यवहाराची पद्धत यांसह अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मिरज - म्हैसाळ (ता. मिरज) येथे झालेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडातील औषध विक्रेत्यांची भूमिका पोलिसांनी महत्त्वाची मानली आहे. त्याला अनुसरून सांगलीतील औषध वितरक भरत शोभाचंद गटागटला पोलिसांनी आज अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. डॉ. खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या सुनील खेडेकर या औषध विक्रेत्याकडील कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे त्याचा उलगडा झाला. खेडेकरकडील तपासात गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाच्या विक्रेत्यांची नावे, त्यांची व्यवहाराची पद्धत यांसह अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आज सांगली, मिरज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांपासून ते खासगी रुग्णालयातील औषध विक्रेत्यांना रडारवर घेतले. 

केवळ पैशाच्या हव्यासापोटी म्हैसाळमध्ये घडलेल्या भ्रूण हत्याकांडामध्ये एक मोठी साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये औषध विक्रेत्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. याच साखळीमधील एका औषध वितरकाकडील कर्मचारी सुनील खेडेकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून काही औषध वितरकांच्या नावांचा उलगडा झाला. यामध्ये "डिस्पोज किट टॅब' या औषधाचा गर्भपातासाठी वापर केला जात असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता औषधाची ठोक विक्री केल्याप्रकरणी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञ भवनसमोरील भरत शोभाचंद गटागट (वय 48) याचे नाव पुढे आले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर गटागटचे दुकान, घर आणि गोदाम या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे घालण्यात आले. या तिन्ही ठिकाणी गर्भपातासाठी विकली जाणारी औषधे सापडली नाहीत; पण त्याच वेळी पोलिसांनी त्याच्या दुकानातील संगणक जप्त करून त्याची तपासणी केली असता "डिस्पोज किट टॅब' या औषधाची गटागट 2013 पासून विक्री करीत असल्याचे संगणकातील नोंदीवरून उघड झाले. 

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा हा मामला संशयास्पद असल्यामुळे व व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांनी भरत शोभाचंद गटागटला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. 

Web Title: Sangli arrest of drug distribution