सांगलीत प्राध्यापकावर कोयत्याने हल्ला 

crime
crime

सांगली - येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) निलंबित विद्यार्थ्याने प्राध्यापकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आशफाक राजेखान मुलाणी (रा. शामरावनगर, सांगली) असे हल्लेखोर विद्यार्थ्याचे नाव असून, प्रा. दिलीपकुमार संगनराव भोरे (वय 58, रा. कचरे सोसायटी, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः आशफाक मुलाणी हा येथील माधवनगर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकतो. तो मोटार मेकॅनिक विभागाचा विद्यार्थी आहे. दुसऱ्या वर्षात शिकताना त्याने वारंवार गैरहजेरी लावली. त्याची एकूण उपस्थितीत केवळ 55 टक्के इतकी होती. त्याबाबत त्याच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे नियमानुसार 80 टक्के हजरे नसल्याचे कारण देत त्याला निलंबित करण्यात आले. या कारवाईचा राग मनात धरून त्याने प्रा. भोरे यांना 23 जानेवारी रोजी धमकी दिली होती. "माझ्यावर हाप मर्डरचे गुन्हे आहेत', अशा भाषेत धमकी दिली होती, असे प्रा. भोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानंतर त्याने मंगळवारी सकाळी 9 वाजता कॉलेजमधील मेकॅनिकल विभागात येऊन प्रा. भोरे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या गालावर जखम झाल्याचे पोलिसांत नोंद आहे. यावेळी प्रा. भोरे चक्कर येऊन कोसळले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी मुलाणी याच्यावर कलम 307 अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com