सांगलीत शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मागणी; उद्या मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

सांगली - शिवाजी विद्यापीठाचे (कोल्हापूर) उपकेंद्र सांगलीत व्हावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगलीसह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून तीन हजार युवक सहभागी होतील, अशी माहिती सांगली जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, सांगली शहराध्यक्ष रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामदादा कोते-पाटील करणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक कामांसाठी कोल्हापूरला जावे लागते. विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा शिवाय गैरसोयही होते. ते टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठांच्या सांगली उपकेंद्रांची गरज आहे. सांगली शहरात दोन दिवस ही भूमिका आम्ही महाविद्यालयीन युवकांना समजावून सांगितली. त्यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चातही मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.’’

जिल्हा परिषद समोरील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरवात होईल. राममंदिर, स्टेशन चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पटांगणावर जाईल. या वेळी विशाल सूर्यवंशी, सागर नलवडे, ज्ञानेश पाटील, विजय आडसूळ, महेश जाधव, संकेत पाटील, महादेव पट्टणशेट्टी, अक्षय जाधव, दत्तात्रय माळी, कैलास शिंदे, अमोल खंचनाळे, पंकज बनसोडे, विजय सन्मुख उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका...

02.06 PM

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पुन्हा पावसास सुरवात झाली. चोवीस तासात नवजाला ४३ व महाबळेश्वरला ४५ मिलीमीटर...

01.06 PM

विविध शाकाहारी पदार्थ : लहान मुलांसाठी फ्रेच फ्राईजची डिश; बार्बेक्‍यू नेशनमध्ये आयोजन कोल्हापूर: पाऊस धोधो कोसळत नसला, तरीही...

12.33 PM