जिल्हा बॅंकेला सहा कोटींचा भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

१४ नोव्हेंबरपासून ३१५ कोटी रुपयांच्‍या जुन्‍या नोटा पडून 
सांगली - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सांगली जिल्हा बॅंकांच्या शाखांत जमा झालेली रक्कम ३१५ कोटी रुपये अजूनही पडून आहे. याचा फटका जिल्हा बॅंकेला बसतो आहे. १४ नोव्हेंबरपासून बॅंकेकडे पैसे पडून असल्याने आतापर्यंत ६ कोटींच्या व्याजाचा भुर्दंड बसला आहे.  

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे,  हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. जिल्हा बॅंकेतही लोकांनी पहिले चार दिवस नोटा भरल्या. मात्र त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले. नोटाबंदी कालावधीत चलन पुरवठा नसल्याने जिल्हा बॅंकांचे काम ठप्प होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात  जिल्हा बॅंकेच्या सर्वाधिक २१७ शाखा आहेत. शेतकरी, मजूर या बॅंकेशी आर्थिक व्यवहाराने जोडले आहेत. जिल्हा बॅंकेत चार दिवसांत ३०० कोटी पाच लाख १६ हजार रुपये जमले. बॅंकेकडे जमा झालेल्या नोटांची नाणेवारी रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डला यापूर्वीच दिली आहे. बॅंकेने जादा आणेवारी असलेल्या शाखांची तपासणी केली. नाबार्डनंतर प्राप्तीकर आणि ईडीने बॅंकेवर छापा टाकला होता. 

शंभर पेट्यांची खरेदी
जुन्या नोटा जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात येणार, अशी गेल्या आठवड्यापासून चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंक प्रशासनाने ही रक्कम पाठवण्यासाठी तब्बल शंभर पेट्या खरेदीची तयारी केली आहे. प्रत्येक पेटीत सर्वसाधारण पाच कोटी रुपये रक्कम बसेल. त्यासाठी चार लाख रुपयांचा विमाही उतरवण्याची तयारी केली आहे.