चार तपासण्यानंतर जुन्या चलनातील 315 कोटींचा निर्णय गुलदस्त्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जमा असलेले 500 व 1000 रुपयांचे जुने चलनातील 315 कोटी रुपये जमा करून घेण्याचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे. नाबार्डसह चार तपासण्यानंतरही जिल्हा बॅंकेच्या जुने चलन जमा करून घेतले जात नाही. जिल्हा बॅंकेला मोठा फटका सहन करावा लागतोय. त्यानंतरही रिझर्व्ह बॅंकेने जुने चलन जमा करून घेतले नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा बॅंका आता पुन्हा न्यायालयीन लढाईचा मार्ग पत्करण्याच्या तयारीत आहेत. 

केंद्राने आठ नोव्हेंबरला पाचशे, हजारच्या जुना नोटा रद्दचा निर्णय घेतला. दोन दिवस बॅंका बंद ठेवल्या. 11 ते 14 नोव्हेंबर या काळात जिल्हा बॅंक मुख्यालयासह 217 शाखांत 500 व 1000 रुपयांच्या नोटा भरून घेण्यात आल्या. ती रक्कम 315 कोटी आहे. 

नाबार्डकडून नोटाबंदीनंतरच्या काळात ज्यानी 500, 1000 च्या नोटा जमा केल्या त्यांची सर्व खाती तपासली. काही खात्यांची ठोबळ मानाने तपासणी केली. जिल्हा बॅंकेतील 217 शाखांत जाऊन नाबार्ड अधिकाऱ्यांनी तपासणी केली.