बिराजदारांची अपात्रता ‘जैसे थे’चा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे संचालकपद रद्द करण्याचा जिल्हा सहकार उपनिबंधकांचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पणन संचालक सुनील पवार यांनी आज दिला. संचालिका बिराजदार यांनी अपात्रतेला आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.  

बाजार समिती संचालक मंडळाच्या सलग सहा सभांना गैरहजर राहिल्याने संचालक पद रद्द करण्याची तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी त्यांचे संचालक पद रद्दचा निर्णय दिला आहे. 

याबाबत संचालिका बिराजदार यांनी राजकीय द्वेषातून अपात्रतेची कारवाई केल्याचे मत जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणीवेळी मांडली होती. मात्र बाजार समितीच्या वतीने संचालिका बिराजदार यांना सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याचे म्हणणे सादर करण्यात आले. तक्रारदार दादासाहेब कोळेकर, संचालिक बिराजदार आणि बाजार समितीनेही म्हणणे जिल्हा उपनिबंधकांनी एकूण घेतले. 

जिल्हा सहकार उपनिबंधक श्री. आष्टेकर यांनी सुगलाबाई बिराजदार यांना अखेर अपात्र ठरवले. जिल्हा सहकार उपनिबंधकांच्या निर्णया विरोधात पणन संचालक पवार यांच्याकडे अपात्र संचालक बिराजदार यांनी अपील दाखल केले होते. आजच्या सुनावणीला सत्ताधारी गटाचे वकील गैरहजर राहिला. त्यामुळे पणन संचालक पवार यांनी पुढील सुनावणी २६ एप्रिलला ठेवली आहे.