गणपतीचे दर्शन घेऊन सांगलीच्या खासदारांची उपोषणाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

खासदार पाटील यांनी आराध्य दैवत श्री गणरायाचे दर्शन घेऊन उपोषणास सुरवात केली.

सांगली - लोकसभेचे अधिवेशन विरोधकांनी चालवू न दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. खासदार पाटील यांनी आराध्य दैवत श्री गणरायाचे दर्शन घेऊन उपोषणास सुरवात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंडप घालून उपोषण सुरू आहे. गाद्या आणि तक्‍क्‍यांची सोय केली आहे. खासदार पाटील यांना केंद्रस्थानी ठेवून देशव्यापी उपोषणाचे डिजीटल लावण्यात आले आहे. सुरक्षाभिंतीच्या ग्रीलला भाजपचे झेंडे बांधण्यात आले आहेत. शहरच्या पदाधिकारी भारती दिगडे यांच्यासह महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप हेही दुपारपर्यंत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sangli MPs begin fasting