चला, नेतृत्व घडवू देशासाठी; 'यिन'साठी उत्साहात मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सांगली: "सकाळ' माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)साठी आज तरुणाईने रांगा लावून मतदान केले. सांगली-मिरजेतील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रक्रिया पार पडली. सोळा उमेदवारांनी निवडणूक लढवली. शनिवारी (ता. 12) दुपारी मतमोजणी होईल. लोकशाहीत सक्षम व सुशिक्षित नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. त्याला तरुणाईसह महाविद्यालय प्रशासनाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सांगली: "सकाळ' माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)साठी आज तरुणाईने रांगा लावून मतदान केले. सांगली-मिरजेतील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रक्रिया पार पडली. सोळा उमेदवारांनी निवडणूक लढवली. शनिवारी (ता. 12) दुपारी मतमोजणी होईल. लोकशाहीत सक्षम व सुशिक्षित नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. त्याला तरुणाईसह महाविद्यालय प्रशासनाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

"यिन' प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयात आणि समाजात वावरणे तरुणाईसाठी प्रतिष्ठेचे बनलेले आहे. तरुणाईचे प्रश्‍न समजून ते सोडविणे, त्यांच्यासाठी उपक्रम राबविणे यासाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. या निवडणुका म्हणजे भविष्यातील गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील नेतृत्व घडविणारी कार्यशाळाच असते. अलीकडच्या काळातील निवडणुकांमधील गैरमार्ग बाजूला ठेवून लोकशाहीची बीजे रुजविण्याचे काम या प्रक्रियेतून पार पाडले जाते. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील महाविद्यालयांत "यिन'च्या निवडणुकीची तयारी सुरू होती. उमेदवार निवड, त्यांचा प्रचार, मतदानासाठी संकेत अक्षर पोचविणे आणि आज प्रत्यक्ष मतदान हे सारे टप्पे अतिशय शिस्तबद्धपणे सुरू आहेत. आज सांगली, मिरजेतील महाविद्यालयांत मतदान झाले. उद्या (ता. 11) जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांत ही प्रक्रिया होईल.

तरुणाईने केवळ मतांची बेरीज न करता ही प्रक्रिया समजून घेण्यावर भर दिला. आजवर बोटाला कधीही शाई लागलेली नाही, अशा तरुणाईने कुणाला मतदान करायचे, याचा निर्णय घेतानाही सारासार विचार केला. आपले नेतृत्व कुणी करावे, याविषयी त्यांनी ठामपणे एकमेकांशी भूमिका शेअर केल्या. त्याचे प्रतिबिंब मतदानातून उमटताना दिसले. सकाळी दहाला मतदान प्रक्रिया सुरू झाली. सुमारे दोन तास ती सुरू होती. नावनोंदणी, मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावणे आणि मतपत्रिका घेऊन मतदान असे टप्पे होते. मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

महाविद्यालयांचा प्रतिसाद
मथुबाई गरवारे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. ऊर्मिला क्षीरसागर, नीलेश भोसले यांनी सहकार्य केले. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. संतोष माने, प्रा. नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले. भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रुरल डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन येथे प्राचार्य डॉ. राजेश कंठे, प्रा. अखिलेश जाधव यांनी सहकार्य केले. चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये संचालक डॉ. बिराज खोलकुंबे, प्रा. रूपा कुरणे, मल्लिकार्जुन मठद यांनी सहकार्य केले. मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उदयसिंह माने पाटील, प्रा. अण्णासाहेब बिराजदार, प्रा. जितेंद्र भरमगौंडा, प्रा. विश्‍वास सूर्यवंशी, प्रा. संतोष देसाई या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

"यिन' टीमचे नियोजन
"यिन'चे जिल्हा समन्वयक विवेक पवार, प्रशांत जाधव, ओंकार पवार, इंद्रजित मोळे, महंमद मोमीन, पांडुरंग गयाळे, प्रियांका गोडबोले, पौर्णिमा उपळावीकर, शारंगधर पाटील, वृषाली रजपूत.

भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रूरल डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सांगली : सिमरण पिंजारी, सादिमा पठाण, विनायक सूर्यवंशी, ओंकार पाटील, तौसिफ तांबोळी.
* मथुबाई गरवारे महाविद्यालयात, सांगली : निकिता शिंदे, राधिका घोरपडे, सुकन्या जोशी.
* चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली : राजेंद्र हांडगे, सुमंत कदम.
* डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज : सूरज मोरे, माधुरी डोंगरे, धानेश्‍वर माळी.

महाविद्यालय व उमेदवार :
* डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी : सायली चौगुले, कमलाकर औंधकर, तौहिद महंमदइसाक मुलाणी.
* भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रुरल डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, सांगली : सिमरण पिंजारी, सादिमा पठाण, विनायक सूर्यवंशी, ओंकार पाटील, तौसिफ तांबोळी.
* मथुबाई गरवारे महाविद्यालय, सांगली : निकिता शिंदे, राधिका घोरपडे, सुकन्या जोशी.
* चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली : राजेंद्र हांडगे, सुमंत कदम.
* डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज : सूरज मोरे, माधुरी डोंगरे, धानेश्‍वर माळी.

तरुणींचा उत्साह सर्वाधिक...
गरवारे कन्या महाविद्यालयात अत्यंत शिस्तबद्धपणे तरुणींनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्‍क बजावत सर्वाधिक 669 इतकी
मतदानाची नोंद केली. येथे सकाळपासून मतदान संपेपर्यंत रांगा लागल्या आणि तरुणींचा उत्साह सर्वाधिक लक्षवेधी ठरला.