तासगावजवळ ट्रक अपघातात 10 मजुरांचा मृत्यू 

प्रकाश निंबाळकर
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी फारशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक सिंधगीवरून कराडकडे येत होते.

तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील 10 मजुरांचा मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सात पुरूष तीन महिलांचा समावेश आहे. अपघातात ११ जखमी झाले असून त्यांना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

एसटी संप असल्याने या सर्वांनी ट्रक चालकास विनंती करून हे सर्व मजूर कराडला निघाले होते अशी प्राथमिक माहिती आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी फारशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक सिंधगीवरून कराडकडे येत होते. पहाटे हा ट्रक मणेराजुरीच्या माळावर आला असता धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा गेला. या अपघातात ट्रकच्या मागे फरशीवर  बसलेले प्रवाशी फरशी खाली चिरडले गेले. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकच्या केबिनमध्ये बसलेले अन्य 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

माणेराजुरी नजीक गर्द धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. यावेळी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलवण्यात आले तर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.