कृष्णेच्या पात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मगर दिसल्याने कृष्णा नदी पात्रात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे धाबे दणाणले आहेत.

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मगर दिसल्याने कृष्णा नदी पात्रात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे धाबे दणाणले आहेत.

आयर्विन पुलानजीक खुलेआम मगर फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आणि पाणी वाहत असल्याने नदी पात्रातील मगरी या नागरी वस्तीकडे वळत आहेत. वसंतदादा समाधी स्थळाच्या परिसरात नदी पात्रात मगरींचा खुलेआम वावर सुरू आहे.

या मगरी नव्या पुलापासून ते अमरधाम स्मशान भूमीच्या बंधाऱ्यापर्यंत आढळून आल्या आहेत. नदीपात्रात बोटिंग करत असताना ही मगर आढळल्याने परिसरात या मगरींची दहशत वाढलीय.