बलात्कारप्रकरणी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यासह ८ जणांवर गुन्‍हा

बलात्कारप्रकरणी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यासह ८ जणांवर गुन्‍हा

सांगली - अनिकेत कोथळे हत्येप्रकरणानंतर चर्चेत आलेले शहर पोलिस ठाणे आज आणखी एका गुन्ह्याप्रकरणी चर्चेत आले आहे. शहर पोलिस ठाण्याचा निलंबित पोलिस कर्मचारी आकाश प्रकाश दबडे याच्यासह निलंबित महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक श्रीकांत वासुदेव वलसे-मद्रासी (वय ४१, रा. हरिपूर रस्ता) यांच्यासह आठ जणांवर आज बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

संबधित पीडित महिलेने आज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अजरुद्दीन उस्मान टिनमेकर-शेख (२९, अलिशान चौक), संतोष मुळे, सरोजा हेगडे, बाळू रणबिरे, सदाशिव निलवणी, अनिल कांबळे अशी त्यांची अन्य संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी श्रीकांत वलसे आणि अजरुद्दीन टिनमेक यांना अटक केली आहे. अधिक माहिती अशी, की पीडित तरुणीने २००६ पासून आपला लैंगिक छळ  व विनयभंग होत असल्याची फिर्याद दिली आहे. धामणी रोड, आकाशनगर, शंभरफुटी रस्ता परिसरात गुन्हा घडला असून या सर्वांनी लग्नाचे आमिष दाखून फसवणूक करून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com