मिरज सिव्हिलमध्ये विवाहितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

संतोष भिसे
गुरुवार, 24 मे 2018

मिरज - येथील शासकीय रुग्णालयात वैशाली शैलेंद्र कांबळे ( वय 36, रा. तानंग ) या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी, रिपब्लीकन पक्षाने दिवसभर आंदोलन केले. 

मिरज - येथील शासकीय रुग्णालयात वैशाली शैलेंद्र कांबळे ( वय 36, रा. तानंग ) या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी, रिपब्लीकन पक्षाने दिवसभर आंदोलन केले.  यावेळी महिलांनीही ठिय्या मारला. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर वैद्यकिय अधिक्षकांनी प्राथमिक चौकशी केली. आकस्मिक दुर्घटना विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक शिंदे यांना कार्यमुक्त केले. 

ही महिला पहाटे सव्वाचार वाजता पोटदुखीच्या कारणास्तव शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी डॉ. शिंदे ड्युटीवर होते. महिलेची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यावेळी डॉ शिंदे यांनी हलगर्जीपणा केला असे वैद्यकीय अधिक्षकांच्या चौकशीत निदर्शनास आले. यामुळे शिंदे यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढण्यात आहे. त्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या निलंबनाची शिफारस अधिष्ठात्यांकडे करण्यात आली आहे. आंदोलनात रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, सचिन कांबळे, सागर कांबळे, नितीन कांबळे, सागर कांबळे, शिवाजी कांबळे, उमेश धेंडे  आदींनी भाग घेतला. 

Web Title: Sangli News agitation of relatives after woman death in Miraj Civil