सांगली पालिकेतील गोंधळाचा आता जनतेपुढे जागर 

सांगली ः सर्वपक्षीय कृती समितीची ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली.
सांगली ः सर्वपक्षीय कृती समितीची ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली.

सांगली - महापौर आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त आणि प्रशासनाविरोधात आंदोलन व इशाऱ्यांची भाषा सुरू केल्यानंतर आता सर्वपक्षीय समितीने या तिघांनाही विकासकामांसाठी जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या समितीच्यावतीने आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरी प्रश्‍नांवर रान उठवण्याच्या मोहिमेची सुरवात करण्यात येईल. येत्या 24 डिसेंबरला मोहिमेचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक एकमध्ये जनजागरण सभा घेण्यात येईल. हे सारेच टक्केवारीसाठी भांडत असून त्याचा सोक्षमोक्ष जनतेसमोर करण्याचा निर्धार सर्वांनी केला. 

येथील कष्टकऱ्यांच्या दौलत सभागृहात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची आज तातडीची बैठक झाली. महापौर हारुण शिकलगार यांनी आयुक्तांना लक्ष्य केले आहे. त्याआधी राष्ट्रवादीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या या भूमिकांचा अर्थ लावणे आणि लोकांच्या बाजूने विकास कामासाठी रेटा उभा करणे या हेतूने आजच्या सभेचे आयोजन केल्याचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी सांगितले. शेवटी तुमचे भांडण नेमके कशासाठी आहे याचा खुलासा आयुक्त आणि महापौर-लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी करावा. तुम्ही मालक नसून जनतेचे सेवक आहात ही जाणीव करून देण्यासाठी उद्या महापालिकेत नागरिकांसह धडक मारण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर येत्या 24 डिसेंबरपासून जनजागरण सभा सुरू करण्याचा निर्णय झाला. पंचशीलनगरात पहिली सभा होईल. बैठकीतील चर्चेत वि. द. बर्वे, संजय पाटील, विकास मगदूम, प्रशांत भोसले, उमर गवंडी, सर्जेराव पाटील यांनीही भाग घेतला. 


कोण काय म्हणाले 

  • भ्रष्टाचाराचे चित्र बदलण्यासाठी जनजागरण हवे. या लढ्यात आम्हीही असू - प्रा. शरद पाटील 

  • महापौर, आयुक्तांमध्ये भांडणाचे कारण त्यांनी लोकांसमोर येऊन सांगावे - बापूसाहेब मगदूम 

  • पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन असे कोणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत - अमर पडळकर 

  • नगरसेवक व प्रशासनात नैतिकताच उरली नसून सारे मिळून भ्रष्टाचार करीत आहेत - आसिफ बावा 

  • प्रत्येकाने आपले प्रगती पुस्तक जाहीर करावे म्हणजे लोकांना कामाची तपासणी करता येईल - आयुब पटेल 

  • सध्याची भांडणे वाटा मिळावा यासाठीच आहेत - पृथ्वीराज पवार 

  • सारेच निधीचे कोटी कोटींचे आकडे सांगतात; मग निधी गेला कोठे? - गौतम पवार  

  • समितीने आपल्या कामाच्या कक्षा ठरवून लढे उभे करावेत - सुरेश दुधगावकर 

  • स्वच्छ, चारित्र्यवान लोक पालिकेत आले तर भ्रष्टाचार थांबेल - युनूस महात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com