अमरनाथला जाणार चौदाशेंचा ताफा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सांगली - जम्मू-काश्‍मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी यात्रामार्गावर असलेले जिल्ह्यातील १५० भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. त्यात सांगलीवाडी, हरिपूर येथील भाविकांचा समावेश आहे. आणखी १ हजार ४०० भक्तांचा ताफा पुढील आठवड्यात अमरनाथसाठी रवाना होतोय.  

जम्मू-काश्‍मीरमध्ये सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर लष्कर अतिशय सावध झाले असून यात्रा मार्गावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याबाबत हरिपूर येथून गेलेल्या यात्रेकरूंशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तेथील अनुभव ‘सकाळ’ला सांगितले. 

अमरनाथ यात्रामार्गावर पावला पावलावर सैनिक आहेत. त्यांच्या देखरेखीखालीच आमची अमरनाथ यात्रा सुरू आहे. आज सकाळीच अमरनाथ दर्शन करून आम्ही आता पहेलगाम मार्गे जम्मूकडे निघालो आहोत. तिथे कटरा येथे आमचा मुक्काम ठरला आहे. सध्या सुरक्षा दलांनी आम्हाला अनंतनाग रस्त्यावरच थांबवून ठेवले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. विजय सूर्यवंशी, सचिन यादव, रघुनाथ शेरीकर, राजाभाऊ  आळवेकर, नारायण फाकडे, पापा सूर्यवंशी असे सहाजण सध्या या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

श्री सूर्यवंशी म्हणाले,‘‘यात्रेकरुंवरील हल्ल्यामुळे काश्‍मिर खोऱ्यात देश आणि जगभरातून आलेले  यात्रेकरून हादरले आहेत. सेनादलांनेही यात्रेचा संपुर्ण मार्ग ताब्यात घेतला असून बघावे तिकडे सैनिकच आहेत. जाताना घोड्यांवरून जाऊन आम्ही अमरनाथ दर्शन केले. येतेवेळी सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर आम्ही पायीच पार करून आलो आहोत. त्यानंतर १९ हजार रुपये खर्च करून आम्ही इनोव्हा गाडी भाड्याने घेतली आहे. या गाडीनेच आमचा सध्या प्रवास सुरु आहे. एक ते दोन तासाच्या प्रवासानंतर थांबे घेत आम्ही सैनिकांच्या संरक्षणातच जम्मूच्या दिशेने निघालो आहोत. यात्रेदरम्यान सुविधांची कमतरता नाही. जागोजागी असलेली लंगर यात्रेकरूच्या सेवेत आहेत. मात्र सैनिकांच्या परवानगीशिवाय रस्त्यावरून जाता येत नाही. त्यामुळे आम्ही रात्री किती वाजता कटळा मुक्कामी पोहचू हे सांगता यायचे नाही.’’