सांगलीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद; मानधन थकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सांगली: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिलपासूनच थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्यावी, खाण्यायोग्य आहार द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषद कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. शासना विरोधात जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. दिल्ली, मुंबईच सरकार काय... म्हणतयं, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय.., होश मे आओ... होश मे आओ... हमसे जो टकरायेका... मिठ्ठी मे मिल जाएगा..! ' आदी घोषणा देण्यात आल्या. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदन दिले.

कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसांची हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष स्नेहलता कोरे, आनंदी भोसले, नादिश नदाफ, अरुणा झगडे यांनी नेतृत्व केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला तरी प्रश्‍न सुटले नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांत सरकारविरोधात मोठा असंतोष दिसून आला.

प्रमुख मागण्या अशा-
राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी नेमलेल्या शिफारस स्विकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, अंगणवाडीतील मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असतो. केवळ 3 टक्के मुले आहार खातात. बाकी वायाच जातो. खाण्यायोग्य आहार द्यावी, आहारासाठीची प्रति लाभार्थी 4.42 रुपये मिळतात, त्यात महागाईच्या पटीत तीनपटीने वाढ करावी, एप्रिलपासून मानधन न मिळाल्यामुळे उपासमारी सुरु झाली आहे. मार्चपासूनचे तातडीने मानधन द्यावे, एप्रिल 2014 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची रक्कम तातडीने द्यावी, लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत आले आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक द्यावा, रिक्त जागांवर सेविका, मदतनीसांची नेमणुक करावी, प्रवास खर्चाची सन 2011 पासूनची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभूते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, कल्पना पवार, माधुरी जोशी, मथुरा कांबळे, सुलोचना पाटील, सरला घोडे, बिस्मिल्ला मुल्ला, सुरेखा गायकवाड, जयश्री जाधव, कस्तुरा पट्टणशेट्टी, अरुणा जोशी, दयावती अजेटराव, मंगल माळी यांनी मोर्चाचे संयोजन केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :