तारांकित प्रश्‍नामुळे पोटशूळ का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

विटा - जनतेचे प्रश्‍न विधानसभेत मांडणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला वाईट वाटते किंवा चांगले वाटते याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. माझी बांधिलकी विटेकर जनतेशी आहे. पाणीपुरवठा योजनेबाबत मी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला, त्यामुळे तुम्हाला एवढा पोटशूळ का व कशासाठी आलाय? अशा तीव्र शब्दांत टीका करीत आपण विटा पालिकेचे विश्‍वस्त आहात, मालक नाही. त्यामुळे माझ्याबद्दल बोलताना जबाबदारीने बोलावे, असा सल्ला आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांना नाव न घेता दिला आहे.

विटा - जनतेचे प्रश्‍न विधानसभेत मांडणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला वाईट वाटते किंवा चांगले वाटते याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. माझी बांधिलकी विटेकर जनतेशी आहे. पाणीपुरवठा योजनेबाबत मी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला, त्यामुळे तुम्हाला एवढा पोटशूळ का व कशासाठी आलाय? अशा तीव्र शब्दांत टीका करीत आपण विटा पालिकेचे विश्‍वस्त आहात, मालक नाही. त्यामुळे माझ्याबद्दल बोलताना जबाबदारीने बोलावे, असा सल्ला आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांना नाव न घेता दिला आहे. या वेळी नगरसेवक अमोल बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजू जाधव उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, ‘‘विटा शहरातील उपनगरांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या भागातील लोकांनी निवेदनाद्वारे माझ्याकडे मागणी केलेली होती. त्यामुळे विट्यातील पाणीटंचाईबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, गेली दहा वर्षे आमदारकी तुमच्याकडेच होती. मग सभागृहात प्रश्‍न मांडला का..? प्रत्येक पालिका निवडणुकीवेळी पाणीपुरवठा योजनेबाबत आश्‍वासने दिली आहेत. मात्र, शहरातील सर्व उपनगरांना पुरेसे पाणी देऊ शकलेला नाहीत.  विटेकर जनतेच्या पाठबळावरच मी आमदार झालो आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न विधानसभेत मांडणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला वाईट वाटते किंवा चांगले वाटते याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. माझी बांधिलकी जनतेशी आहे. पाणीपुरवठा योजनेबाबत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. त्यामुळे तुम्हाला एवढा पोटशूळ का व कशासाठी आला आहे? अशी टीका त्यांनी केली.

श्री. बाबर म्हणाले, ‘‘सध्याची पाणी योजना ही युती सरकारच्या काळातच मंजूर झाली होती. त्या वेळी फार मोठे काम केले, असे शासनाला तुम्हीच सांगितले होते. मात्र, शासन गेलं की त्यांना विसरला आहात. जनतेच्या प्रश्‍नांचं भांडवल करणारा आणि श्रेयासाठी काम करणाऱ्यांपैकी मी नाही. मला श्रेय द्यावं म्हणून मी कुणाला विनंती केलेली नाही. एक वेळ माझं अभिनंदन केलं नाही तरी चालेल; परंतु मुख्यमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्र्यांचे अभिनंदन करताय, याचा मला सर्वांत जास्त आनंद आहे.