मिरजेत एटीएम फोडून 18 हजार लंपास

संतोष भिसे
सोमवार, 2 एप्रिल 2018

मिरज - शहरातील कर्मवीर चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीम काल मध्यरात्री चोरट्यांने फोडले. यातून 18 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केली आहे. या एटीएममधील खालच्या बाजुचा ड्राँवर फोडता न आल्याने लाखो रुपयांची रोकड चोरट्याच्या हाती लागली नाही. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरटा एटीएममध्ये शिरला. त्याने चेहरा रुमालाने झाकला होता. आत येताच सीसीटीव्ही कँमेरा दुसरीकडे वळवला. कटावणीने एटीएमचा एक खण उघडण्यात तो यशस्वी ठरला. त्यामध्ये सुमारे 18 हजारांची रोकड होती. ती घेऊन तो पसार झाला. आज सकाळी काही नागरीकांना एटीएममध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.  शहर पोलिसांनी श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Sangli News ATM robbery in Miraj