मिरजेत एटीएम रक्षकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मिरज (सांगली) : शिवाजी रोडवर असलेल्या बँक आँफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकाचा अज्ञातांनी खून करुन एटीएम फोडल्याची घटना घडली आहे.

रामराव कृष्णा जाधव (वय ६२) असे मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनाहत्यार सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेचे खरं नाही, ते पैसा, मालमत्तेची सुरक्षा काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षारक्षकांनी स्वत:ची सुरक्षा कशी करायची. जीव तरी कसा वाचवायचा? जीव गेला तरी भरपाईची काहीच तरतूद नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.