विट्यातील जमदाडे - खत्री यांची कुस्ती बरोबरीत

प्रताप मेटकरी
बुधवार, 11 एप्रिल 2018

विटा - येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त कुस्ती मैदान झाले. यात राष्ट्रीय विजेता माऊली जमदाडे विरूद्ध भारत केसरी मनजीत खत्री यांच्यात काटा लढत झाली. एक लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाची ही कुस्ती पाऊणतास चालली. अखेर कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.

विटा - येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त कुस्ती मैदान झाले. यात राष्ट्रीय विजेता माऊली जमदाडे विरूद्ध भारत केसरी मनजीत खत्री यांच्यात काटा लढत झाली. एक लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाची ही कुस्ती पाऊणतास चालली. अखेर कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.

प्रमुख लढतींबरोबरच या मैदानात दीडशेहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीशौकीन उपस्थित होते.  

येथील श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त तालुका क्रीडा संकुलाजवळील आखाड्यात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते झाले. मैदानात पंच म्हणून विजयआप्पा पाटील, प्रा. सुर्यकांत शिंदे, अभिजीत पाटील, आलम तांबोळी, भाऊसाहेब पाटील, विकास पाटील यांनी काम पाहिले.

व्दितीय क्रमांकाची लढत विलास डोईफोडे विरूध्द विजय धुमाळ यांच्यात झाली. यात विलास डोईफोडे विजयी झाला. तृतीय क्रमांकाची लढत विट्याचा सुपुत्र महाराष्ट्र चॅम्पियन अभिजीत मोरे विरूध्द राष्ट्रीय विजेता अमरजीत बिनिया यांच्यात झालेल्या चटकदार कुस्तीत कलाजंग डावावर अमरजीतला अभिजीतने आस्मान दाखविले.

या मैदानात माधुरी शिंदे, पूजा लोंढे, प्राजक्ता पाटील, हर्षदा मगदूम, गौरी शिंदे, प्रेरणा गायकवाड या मुलींनी चटकदार व प्रेक्षणीय कुस्त्या करत प्रतिस्पर्धी मुलींना चीतपट केले.  

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, माजी सभापती अविनाश चोथे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, विराज केन्स शुगरचे कार्यकारी संचालक विशाल पाटील, नगरसेवक पद्मसिंह पाटील, फिरोज तांबोळी, आप्पा पाटील, पांडुरंग पवार, दत्ता साठे, प्रशांत कांबळे, अमित भोसले, विकास जाधव, मैनुद्दीन पठाण, रवींद्र कदम, कैलास भिंगारदेवे, राहुल रूपनर, साहेबराव होनमाने, संजय पाटील यांच्यासह कुस्तीशौकीन उपस्थित होते. सुत्रसंचालन सुरेश गवळी यांनी केले.  

गटनिहाय विजेते मल्ल  

30 किलो वजन गट : रोहन पाटील, रोहित तामखडे, विराज घार्गे, धीरज तामखडे, राज देशमुख, गौरव माने, अविनाश कारंडे, गौरव जाधव, प्रथमेश मदने.  

40 किलो गट : वैभव शेळके, विकी तामखडे, रोहित तामखडे, अजित पाटील, रोहन पवार, नितीन तामखडे, रणधीर शिंदे, गौरव मदने.  

50 किलो गट : इम्रान मुजावर, रोहित पाटील, राहुल निकम, विश्‍वजीत साळुंखे, रोहित काळे, बापू शिरतोडे, आकाश जाधव.  

60 किलो गट : आकाश निकम, रोहन सुर्यवंशी, निलेश शिंदे, अमोल सातपुते, विवेक पाटील, शशिकांत गावडे, सनीकुमार अवघडे, तुकाराम तामखडे, विजय चन्ने, साहील तामखडे, संग्राम जाधव, आफताब पटेल, विक्रम तामखडे, उदय पवार.  

70 किलो गट : लयलीत गायकवाड, अभिजीत करे, निलेश सुडके, किरण तामखडे, प्रतीक साळुंखे, योगेश तामखडे, अक्षय साळवी, ओंकार सावंत, मयुरेश मरळे, तेजस लोंढे, सौरभ तामखडे, रोहित एडके, स्वराज तामखडे.  खुला गट : अक्षय मदने, संग्राम काकडे, खाशाबा मदने, शंभूराज पाटील, ओंकार मदने, कन्हैय्या माने, अनिकेत गावडे, श्रीकांत निकम, विशाल माने, सागर तामखडे, शेखर रासकर

विट्यात आमलीच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात

विटयाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त आमलीच्या गाड्यांची मिरवणूक उत्साहात झाली. अनेक शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्याची पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलालाची मुक्त उधळण करत "नाथबाबाच्या नावानं चांगभलं" च्या जयघोषात आमलीच्या गाड्यांची मिरवणुका काढल्या. 

आमली गाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी क्लिक करा

 

Web Title: Sangli News Bhairavnath ushav vita