सांगलीत आज ‘सकाळ’तर्फे ‘संधी’चे व्यासपीठ

सांगलीत आज ‘सकाळ’तर्फे ‘संधी’चे व्यासपीठ

सांगली - तरुणांचे हक्काचे व्यासपीठ ‘यिन’च्या उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्यावतीने उद्या (ता. ९) शहरातील सहा महाविद्यालयांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि उद्योगांमधील करिअरच्या संधींबद्दलच्या मार्गदर्शक कार्यशाळा होत आहेत. सकाळी १० ते ११ आणि साडेअकरा ते साडेबारा या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळा सर्वांसाठी खुल्या असतील. 

प्रचलित शिक्षण व्यवस्थेत शिक्षण घेत असतानाच करिअरसाठी काही पूरक कौशल्ये आणि प्रशिक्षणाची नितांत गरज असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी ते खूप गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि रचनात्मक प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या माध्यमातून अशा  उपक्रमांची सातत्याने आखणी केली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘सिमॅसिस’ या उपक्रमाची सुरवात आहे.

समाजात सकारात्मक व शाश्‍वत परिणाम घडवून आणणे, व स्वतःचा आणि कुटुंबाचा परिपूर्ण विकास, नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक उपाययोजना आणि प्रशिक्षणाचे एका यशस्वी उद्योजकात किंवा कार्यक्षम कर्मचाऱ्यांत रूपांतर घडवून आणणे अशी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. हे एक कौशल्य विकासाचे सुयोग्य व्यासपीठ आहे. ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल ठरेल. राज्यभरातील महाविद्यालये, संस्थांचे जाळे विणताना लाईव्ह बेबिनार्स, इंटर्नशिप प्रोजेक्‍ट, व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण, मेन्ट्रारशिप आणि इन्क्‍युबेशन किंवा उद्योगासाठी बीज भांडवल अशा अनेक अंगाने हा अभ्यासक्रम पुढे जाईल. प्रकल्पावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. नावीन्यपूर्ण समाजाला दिशा देणाऱ्या कल्पनांना आवश्‍यक ते बीज भांडवल देण्यासाठीही ‘सकाळ’ बळ उभे करणार आहे. वर्गाच्या भिंतीच्या चौकटीपलीकडे जाऊन ज्ञान- प्रशिक्षणाचे द्वार खुले करण्याचा हा प्रयत्न आहे. उद्याच्या या कार्यशाळेसाठी करिअर इच्छुक प्रत्येकाचे स्वागतच असेल.

महाविद्यालयनिहाय कार्यशाळांची वेळ
सकाळी ९.३० - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, मथुबाई गरवारे महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय.
सकाळी ११.३० - चिंतामणराव व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग.

कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतःला सोयीचे ठरेल अशा वेळेत आणि महाविद्यालयात आपला सहभाग नोंदवू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com