सर्वांच्या डोक्‍यांवर मिरवते चायना छत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

सांगलीत पावसाळी मार्केट बहरले - फॅन्सी रेनकोटचीही वाढती क्रेझ
सांगली - पावसाळा आला की छत्रीचा शोध सुरू होतो. अडगळीत पडलेली छत्री सापडली तर ठीक, नाही तर पुन्हा नवी छत्री विकत घ्यायची तयारी ठेवावी लागते. यासाठी आता मार्केट फुलले आहे. ‘स्वस्तात मस्त’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या चायनाने छत्र्यांचे मार्केटही काबीज केले आहे.

त्यामुळेच छत्र्यांची किंमतही तशी फारशी नसल्याने खरेदीवर उड्या पडत आहेत. अर्थात सध्या भारतीयांच्या डोक्‍यावर चिनी छत्री मिरवती आहे. 
सध्या पावसाचा हंगाम आहे. यात छत्र्यांची गरज प्रत्येकालाच भासते. बाजारात फेरफटका मारल्यास काळ्या छत्र्यांऐवजी रंगबेरंगी चायनाच्या छत्र्या ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. 

पन्नास ते दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या छत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या छत्र्या घडी करून पर्समध्येही ठेवता येतात. ‘चायना मेड’ छत्र्या तयार करताना महिलावर्गासह बच्चेकंपनीलाही खूश करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. त्यामुळेच छत्र्या उघडताच स्पायडर मॅन, पोकी मॅन, बेबी डॉल वेलकम करतात. रंगीबेरंगी रेनकोटनाही तितकीच मागणी बाजारपेठेत आहे. 

कॉलेज कॉर्नर, अामराई रोडलगत, मारुती रोड, कापडपेठ आदी ठिकाणी विक्रेत्यांकडे विविध रंगांचे आणि चित्रांचे रेनकोटही लक्ष वेधत आहेत. त्यांच्या किमती अडीचशेपासून दीड हजार रुपयांपर्यंत आहेत.