चाराछावणीप्रकरणी १४८ संस्थांवर गुन्हा

चाराछावणीप्रकरणी १४८ संस्थांवर गुन्हा

सांगली - दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-१४ या काळात चाराछावणीत जादा जनावरे दाखवून आणि आदेशाचे उल्लंघन करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी १४८ छावणीचालक व संस्थांवर आज फौजदारी दाखल केली आहे. त्यात आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि मिरज तालुक्‍यांतील अनेक सहकारी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना याआधीच ९ कोटी ९९ लाखांचा दंड करून ती रक्कम मूळ बिलांतून वजा केली आहे. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी आहे.

काळम म्हणाले, ‘‘टंचाई काळात जत, कडेगाव, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू केल्या होत्या. छावणी चालकांनी शासनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले होते. त्याची त्यावेळी चौकशी झाली होती. टॅगिंग, बारकोडिंग न करणे, निवारा शेड न उभारणे, कडबाकुट्टी उपलब्ध असून वापर न करणे, जादा जनावरे दाखवणे अशा प्रकारची अनियमितता आढळली होती. १४८ चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे त्यावेळी छावणी चालकांच्या देयकातून तब्बल ९ कोटी ९९ लाख ३९ हजार २५३ इतकी रक्कम कपात करण्यात आली होती.’’

ते म्हणाले, ‘‘ही कारवाई अपुरी असल्याबद्दलची जनहित याचिका सांगोला येथील गोरख आनंदा घाडगे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या जनहित याचिकेचे रूपांतर नंतर फौजदारी खटल्यात झाले. न्यायालयाने शासनाला आणि शासनाने जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. येथे १५ सप्टेंबर २०१७ रोजी तसे आदेश मिळाले. गेले काही महिने त्या प्रकरणांच्या फाईल काढणे, त्याची छाननी करण्याचे काम सुरू होते. आज त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये सध्या सक्षम शासकीय अधिकाऱ्यांच्या दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे, असे कलम लावले आहे. पुढे त्यात आणखी गुन्हे दाखल होतील.’’

तेव्हाची कारवाई
जत तालुक्‍यातील २५ छावणीचालकांना ३.२६ कोटी, कडेगाव तालुक्‍यातील एका छावणीचालकाला १ लाख ३१ हजार, मिरज तालुक्‍यातील एका छावणीला १ लाख १८ हजार, तासगाव तालुक्‍यातील ३३ छावणीचालकांना ९५ लाख ६७ हजार, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २४ छावणीचालकांना २.७० कोटी, खानापूर तालुक्‍यातील १५ छावण्यांना २२ लाख ७९ हजार तर आटपाडीतील ४९ छावणी चालकांना २.८१ कोटींचा दंड केला होता. 

संस्थांची नावे अशी...
* जत तालुका ः जय हनुमान विकास संस्था (बाज), श्री विठ्ठल शिक्षण संस्था (शिंगणापूर), श्री उत्कर्ष चॅरिटेबल (आवंढी), मल्लिकार्जुन मजूर संस्था (बसर्गी), वाळेखिंडी सोसायटी (वाळेखिंडी), राजारामबापू कारखाना (बनाळी), बाबासाहेब पाटील कला मंडळ (कुडनूर), जय भवानी दूध संस्था (अंत्राळ), श्री सुशीलकुमार संस्था (अंकले), लोहगाव सोसायटी (लोहगाव), रेवनाळ दूध संघ (रेवनाळ), पांडुरंग पाणी संस्था (येळवी), शिवबाराजे फाऊंडेशन (बेवनूर), ग्रामविकास वाचनालय (सिंदूर), जय हनुमान वाचनालय (खैराव), अप्पासाहेब पाटील ट्रस्ट (दरिबडची), कंठी सोसायटी (कंठी), जिरग्याळ सोसायटी (जिरग्याळ), अहिल्यादेवी पतसंस्था (गुळवंची), श्रीकृष्ण पतसंस्था (शेगाव), श्री मल्लिकार्जुन प्रतिष्ठान (खोजानवाडी), सोनारसिद्ध संस्था (नवाळवाडी), जय भवानी शिक्षण संस्था (बेळुंखी), माणगंगा कारखाना (वायफळ), श्रीधरपंत संस्था (खंडनाळ). * मिरज तालुका ः श्री जैन श्‍वेतांबर ट्रस्ट (सिद्धेवाडी). * कवठेमहांकाळ तालुका ः शेतकरी दूध संघ (अलकूड), रांजणी शिवाजी सोसायटी  (रांजणी), घाटनांद्रे सेवा संस्था (घाटनांद्रे), बाबूराव पाटील संस्था (कोळे), शेतकरी दूध संघ (कुची), हनुमान पतसंस्था (आगळगाव), शेतकरी दूध संघ (इरळी), हनुमान मजूर संस्था (नांगोळे), भाग्यलक्ष्मी सहकारी संस्था (जाखापूर), खरसिंग सोसायटी (खरशिंग), कुंडलापूर सेवा संस्था (शेळेदाडी), हनुमान मजूर संस्था (आरेवाडी), एस.डी.एम. शुगर प्रा. लि. (नागज), पुण्यलक्ष्मी अहिल्यादेवी स्मारक समिती (आरेवाडी), अजितराव घोरपडे सोसायटी (ढालगाव), विश्‍वविजय शिक्षण मंडळ (अग्रण धुळगाव), अजितराव घोरपडे सोसायटी (शिंदेवाडी), सिद्धेश्‍वर मजूर संस्था (ढालगाव), शिवकृपा मजूर संस्था (घोरपडी व दुधेभावी), नालंदा मागासवर्गीय संस्था (चोरोची), अहिल्यादेवी सहकारी संस्था (चांभूळवाडी), शिवकृपा मजूर संस्था (निमज). * तासगाव तालुका ः चैतन्य एज्युकेशन सोसायटी (मोराळे पेड), कापूर अग्रणी मिल्क (मांजर्डे), बाजार समिती तासगाव (सावळज, वायफळे व सिद्धेवाडी), सिद्धेश्‍वर सोसायटी  (सावळज), सिद्धेश्‍वर सोसायटी (उपळावी), पेड मल्हारराव सोसायटी (पेड), श्रीनाथ सोसायटी (आरवडे), वज्ररेश्‍वर सोसायटी (वज्रचौंडी), सुभाष सोसायटी (विजयनगर), डोंगरसोनी सोयायटी (डोंगरसोनी), होनाईदेवी सोसायटी (हातनूर), बस्तवडे सोसायटी (बस्तवडे), बलगवडे सोसायटी (बलगवडे), गोटेवाडी सोसायटी हनुमान सोसायटी (लोढे), ब्रह्मनाथ सोसायटी (लोकरेवाडी), अण्णासो मजूर सोसायटी (खुजगाव), बलभीम सोसायटी (जरंडी), जनता दूध संस्था (कुमठे), सिद्धेश्‍वर सोसायटी (नरसेवाडी), बिरणवाडी सोसायटी (बिरणवाडी), संजयकाका सोसायटी (भैरववाडी), सिद्धेश्‍वर सोसायटी (धामणी), पुणदी सोसायटी (पुणदी), गौरगाव सोसायटी (गौरगाव), दसरा सोसायटी (मतकुणकी), कौलगे सहकारी संस्था (कौलगे), अहिल्यादेवी सोसायटी (यमगरवाडी), सिद्धेश्‍वर सोसायटी (सावर्डे), हनुमान सोसायटी (दहिवडी), जय भवानी कृषी मंडळ (वाघापूर), श्रीनाथ विकास सोसायटी (आरवडे). * खानापूर तालुका ः महालिंग संस्था (पिसेवाडी), श्रेयस ट्रस्ट (विटा), भीमराव तात्या सूर्यवंथी पतसंस्था (करंजे), दीनदयाळ ट्रस्ट (विटा व चिंचणी), शिवप्रताप पतसंस्था (विटा), खानापूर ग्राम पतसंस्था (बेणापूर व बाणूरगड), श्रेयस चॅरिटेबल ट्रस्ट (जोंधळेवाडी), विकास प्रतिष्ठान (पळशी), पतंगराव कदम संस्था (मांगरूळ), बाजार समिती विटा (बलगवडी), विराज डेअरी (धोंडेवाडी), खानापूर पतसंस्था (मोही), मनमंदिर ट्रस्ट विटा (विटा), शिवप्रताप पतसंस्था (साळशिंगे), श्रेयस ट्रस्ट (बुर्ली), शिवरत्न सोसायटी (भिवघाट). * आटपाडी तालुका ः माणगंगा पतसंस्था (आटपाडी), सिद्धनाथ दूध संस्था (घरनिकी), माणगंगा कारखाना (सोनारसिद्धनगर), गोपाळकृष्णा दूध संस्था (शेटफळे), बाजार समिती (खरसुंडी), वाक्षेवाडी विकास संस्था (वाक्षेवाडी), बिरुदेव विकास संस्था (विभूतवाडी), गजानन मजूर संस्था (बनपुरी), गजानन संस्था (करगणी), सिद्धनाथ दूध संस्था (पुजारवाडी), उमादेवी पत्की महिला पतसंस्था (करगणी), राजेंद्रअण्णा देशमुख पतसंस्था (माडगुळे), यशवंतराव चव्हाण दूध संस्था (पाक्षेवाडी-माळेवाडी), गजानन मजूर संस्था (गोमेवाडी), सिद्धनाथ दूध संस्था (दिघंची), अण्णासाहेब मजूर संस्था (निंबवडे), दिघंची विकास सोसायटी (दिघंची), माणगंगा कारखाना सोनारसिद्धनगर (तळेवाडी व तडवळे), पृथ्वीराज देशमुख मजूर संस्था आटपाडी (मापटेमळा), बोंबेवाडी सोसायटी (बोंबेवाडी), शेतकरी दूध संस्था (यपावाडी), बापू सरगर पतसंस्था (करगणी), शेटफळे नळपाणी संस्था शेटफळे (हिवतड), गणेश मजूर संस्था कौठुळी (मासाळवाडी), शिवगणेश संस्था (आवळाई), सिद्धनाथ शेळी-मेंढी संस्था पुजारवाडी (लिंगीवरे), अहिल्यादेवी मजूर संस्था विभूतवाडी (झरे व कामथ), गणेश मजूर संस्था (जांभूळवाडी), शिवगणेश मजूर संस्था कौठुळी (घाणंद), नेलकरंजी विकास संस्था नेलकरंजी (औटेवाडी), निशांत सामाजिक संस्था (पिंपरी), नेलकरंजी विकास संस्था नेलकरंजी (मानेवाडी), सिद्धनाथ दूध संस्था दिघंची (पळसखेल), सिद्धनाथ सोसायटी (दिघंची), भैरवनाथ दूध संस्था (उंबरगाव), देशमुखवाडी विकास संस्था (देशमुखवाडी), अनिलराव बाब सोसायटी करगणी (काळेवाडी), पुजारवाडी विकास संस्था (कौठुळी), अण्णासाहेब लेंगरे सोसायटी (लेंगरेवाडी), जय मल्हार मजूर संस्था निंबवडे (मिटकी), उमादेवी पत्की महिला पतसंस्था करगणी (माळेवाडी), जोतीबा विकास संस्था (पांढरेवाडी), गवळेवाडी विकास सोसायटी (गवळेवाडी), श्रीराम एज्युकेशन सोसायटी (करगणी), विठ्ठल मजूर संस्था (पिंपरी खुर्द), मुढेवाडी विक्‍सास सोसायटी (मुढेवाडी), बाजार समिती आटपाडी (कानकत्रेवाडी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com