अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयात रांगा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सांगली - जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्यास दिवशी काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात गर्दी झाली. सर्वच महाविद्यालयात प्रवेशाचे वेळापत्रक ठळकपणे मोठ्या फलकांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन करीत असल्याचे चित्र होते. सर्वच महाविद्यालयात अर्ज भरून घेण्यासही सुरवात झाली. विद्यार्थ्यांना 30 पर्यंत अर्जविक्री व भरून परत जमा करण्याची मुदत आहे. 

सांगलीसह प्रमुख शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेला प्रवेश मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. कमी टक्केवारी असलेल्या मुलांच्या पालकांनी धास्ती घेतली आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 24 जूनला विद्यार्थ्यांच्या हाती गुणपत्रक पडले. जिल्ह्यातून अकरावीसाठी 39 हजार 653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी 1 ते 4 जुलै कालावधीत होणार आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी 5 जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय, अकरावीचे वर्ग असलेल्या उच्च माध्यमिक शाळांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध होईल. संबंधितांना प्रवेशासाठी 6 ते 10 जुलै कालावधी दिला आहे. अकरावी वर्ग 11 जुलैपासून नियमित सुरू होतील. 

जिल्ह्यातील 232 कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीतील प्रवेश मिळणार आहे. 180 अनुदानित तुकड्यांचा समावेश आहे. सरकारी आयटीआय दहा, खासगी आयटीआय पंधरात तीन हजार 700 आणि डिप्लोमाच्या 22 कॉलेजमध्ये साडेसहा हजार जागा उपलब्ध आहेत.