स्थायी सदस्य निश्‍चितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आज खलबते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सांगली - महापालिकेच्या पुढील पंचवार्षिक निवडणुकांसाठी अवघ्या दहा महिन्यांचा कालावधी उरला असताना होत असलेल्या स्थायी समितीत प्रतिनिधित्वाची अखेरची सोडत कुणाला लागणार, यावर पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य आत येतील. उद्या काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि जयश्री पाटील यांच्यात नावांबाबत चर्चा होईल. राष्ट्रवादीची उद्या, रविवारी पक्ष कार्यालयात बैठक होत आहे. सोमवारी विशेष महासभेत या निवडी होतील.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याच पक्षाशी एकनिष्ठ राहतील असे सदस्य निवडणे दोन्ही काँग्रेसपुढील आव्हान आहे. गतवेळी उपमहापौर गटाने काँग्रेसला दणका देत राष्ट्रवादीशी सोबत केली होती. त्यामुळे काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता मागील अनुभवातून धडा घेत सभापती निवडीत एकनिष्ठ राहू शकतील अशा सदस्यांना संधी दिली जाईल. नावे निवडण्याचे स्वातंत्र्यही जयश्रीताईंनाच असेल, असे संकेत पक्षातून मिळाले. काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. सोमवारी सकाळीच ती नावे दिली जातील. 

राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते शेडजी मोहिते म्हणाले, ‘‘स्थायीवर जाण्यासाठी मैन्नुदिन बागवान, युवराज गायकवाड, राजू गवळी, आशाताई शिंदे, जुबेर चौधरी, बाळासाहेब सावंत, अल्लाउद्दिन काझी, कांचन भंडारे इच्छुक आहेत. त्यांच्या नावांची माहिती मी कालच नेते जयंत पाटील यांच्याकडे कळवली आहे. त्यांपैकी दोघांची नावे तेच निश्‍चित करतील. त्याबाबत उद्या आमची पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे.’’