काँग्रेसवाले भाजपपेक्षा खतरनाक - वामन मेश्राम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सांगली - भाजप मुस्लिमांचा उघड शत्रू आहे. काँग्रेस अास्तिन का साँप आहे. तो आपल्यासोबत राहून आपल्यालाच डसतोय. तो भाजपपेक्षा खतरनाक आहे. हे दोन्ही पक्ष ब्राह्मणवाद्यांच्या प्रभावाखालील असून आता गुलामीतून मुक्तीसाठी मुस्लिमांनी एकत्र येऊन आपल्यातूनच पर्याय उभा करावा लागेल, असे मत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.

सांगली - भाजप मुस्लिमांचा उघड शत्रू आहे. काँग्रेस अास्तिन का साँप आहे. तो आपल्यासोबत राहून आपल्यालाच डसतोय. तो भाजपपेक्षा खतरनाक आहे. हे दोन्ही पक्ष ब्राह्मणवाद्यांच्या प्रभावाखालील असून आता गुलामीतून मुक्तीसाठी मुस्लिमांनी एकत्र येऊन आपल्यातूनच पर्याय उभा करावा लागेल, असे मत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.

येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते. विचारमंचावर मालेगावचे मौलाना अब्दुलहमीद अझहरी, मुफ्ती फारुख, प्रा. नामदेव करगणे, मुफ्ती फारूक, मौलाना फैय्याजूल सिद्दीकी, डॉ. अब्दूलमन्नान शेख, जिल्हाध्यक्ष रफीक मुजावर, मुफ्ती मुजम्मील, मुफ्ती  जुबेर आदी उपस्थित होते. 

मेश्राम म्हणाले, ‘‘ब्राह्मण शासक आणि इतर गुलाम ही परिस्थिती देशात इंग्रज येण्याआधीपासून आहे. काही फरकाने नावे बदलली, स्थिती तीच आहे. पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात साठ टक्के ब्राह्मण होते. त्यामुळे काँग्रेस आपली या भ्रमात राहू नका. भाजपला हटवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय असा भोळा विचार करू नका. दोन्ही जातकुळी एकच आहेत. मुस्लिमांना दडपणाखाली, भीतीच्या छायेखाली ठेवून त्यांच्या मदतीने सत्ता गाजवण्याचा काँग्रेसने वर्षानुवर्षे डाव खेळला आहे. आता चित्र फार वेगळे नाही. साडेतीन टक्के समाजाने मुस्लिम व  बहुजनांत फूट पाडून हिंदुत्वाचा शिक्का चालवला आहे. ज्या साडेतीन टक्के मतांनी गावचा सरपंच होत नाही, त्यांनी थेट हवा तो पंतप्रधान बनवला आहे. नरेंद्र मोदी हे ओबीसी चेहरा आहेत, मात्र ते काम संघाचे करताहेत. ओबीसींची मुस्कटदाबी करण्यासाठी ओबीसींचाच चेहरा वापरण्याचा जहरी डाव भाजप खेळत आहे.’’

ते म्हणाले,‘‘भाजप आपला उघड शत्रू आहे, मात्र काँग्रेसने तरी कुठे आपले भले केलेय. आपली गुलामगिरी कालही होती अन्‌ आजही आहे. आपली १५ टक्के मते ही  ताकद बनवा. काँग्रेसला २०१४ च्या निवडणुकीत  १८.५ टक्के मते मिळाली. त्यातून १५ टक्के वजा झाली तर काय राहते ताकद. तुमचे १५ टक्के निर्णायक आहेत, ते आपल्यासारख्या गुलामगिरीतून मुक्तीसाठी झटणाऱ्यांच्या पारड्यात टाका. आता ते कोण, हे  एकदाचे ठरवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सज्ज रहा.’’

मौलाना अजहरी म्हणाले,‘‘या देशात कुणी तोंड उघडायचे नाही, असे भाजपवादींना वाटते. या मुस्कटदाबीविरुद्ध उभे रहावे लागेल. गोरक्षेच्या नावाखाली दंगे केले जात असतील तर कुणासाठीच हा देश सुरक्षित राहणार नाही.’’

भाजप, काँग्रेस हिंदुत्ववादीच
वामन मेश्राम म्हणाले,‘‘काँग्रेसवाले आता आम्ही पण हिंदुत्ववादीच आहोत, असे सांगताहेत. भाजप कट्टर हिंदुत्ववादी तर आम्ही मवाळ हिंदुत्वावादी असल्याचे सांगतात. आता दगड असो वा वीट, डोके फुटणारच आहे. त्यामुळे आम्हाला दोन्ही प्रकारचा हिंदुत्ववाद नको आहे.’’