सांगली पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरक्षणावरून गोंधळ

सांगली पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरक्षणावरून गोंधळ

सांगली - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच गोंधळ उडाला. आरक्षण उठवण्याचा विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमशान झाल्याने अवघ्या अर्ध्या तासातच महासभा गुंडाळण्याची वेळ महापौरावर आली. यावेळी महापौरांनी सभेतून पळ काढला. यावेळी विरोधकांनी सभागृहात महापौरांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.

सांगली महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा आज आयोजित केली होती. या सभेत नागरी वस्त्यांवरील आरक्षणे उठवणेबाबतचे विषय चर्चेला होते. या विषयांचा अनुषंगानेच अनेक खुल्या जागा वरील आणि बिगर शेती (एनए) झालेल्या जागांवरील आरक्षणे उठवण्याचा प्रकार शिवसेनेने उघडकीस आणला. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी गटाच्या या गैरकारभाराचा बुरखा फाडत नागरी वस्त्यांवरील आरक्षणे उठवण्याचा नावाखाली सुरू असलेल्या गैरकारभाला जोरदार विरोध दर्शविला. यावेळी या मुद्द्यावरूनच जोरदार वादाला सुरवात झाली. गैर कामे करू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेने घेत सभागृहात गोंधळ घालायला सुरवात केली. सत्ताधारी गटाकडून सर्व विषय योग्य असल्याचा दावा करीत कोणातही मोकळ्या जागेवरील आरक्षणे उठवली जाणार नाही, असे सांगत महापौरांनी अजेंड्यावरील सर्व विषयांना मान्यता देत सभेचे कामकाज संपवले. यावेळी सभागृहात शिवसेना आणि स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी घोषणाबाजी करीत सत्ताधारी गटाच्या कारभाराचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com