पंपावरील पेट्रोलचोरीला आळा घालणाऱ्या उपकरणाची निर्मिती

संतोष भिसे
बुधवार, 30 मे 2018

मिरज - सुभाषनगर येथील माधवराव लोंढे या तरुणाने पेट्रोल क्वॉंटीफायर नावाचे उपकरण तयार केले आहे. पेट्रोल पंपावर वाहनात नेमके किती पेट्रोल टाकले आहे हे या उपकरणाद्वारे समजणार असल्याचा दावा लोंढे यांनी केला. 

कानपूर आयआयटीमध्ये यांत्रिकीशाखेचे शिक्षण घेणाऱ्या माधवराव याने महेंद्रकुमार गोयल या सहकाऱ्याच्या मदतीने हे उपकरण तयार केले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या टाकीच्या आतील बाजुला ते बसवले जाईल. पंपावर टाकीत सोडले जाणारे पेट्रोल हे उपकरण मोजेल. रिडींग स्वरुपात ही माहिती मोबाईलवर मिळेल. यासाठी वायफाय किंवा ब्ल्यू टुथचा वापर होईल. प्ले स्टोअरवरुन एक ऍप्लीकेशन यासाठी डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. कानपूर आयआयटीने या उपकरणासाठी दोघांच्या नावे पेटंट नोंदणी केली आहे,  असे लोंढे यांनी सांगितले

Web Title: Sangli News Creation of a device that blocks the petrol robbery