कुची येथील डान्स बार, ऑर्केस्ट्रावर बंदीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सांगली - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुची  हद्दीत सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारवर बंदी घालावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज करण्यात आली. मागणीचे निवेदन  संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्‍यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. अशा स्थितीत ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारमुळे तरुण पिढी बरबाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कुची हद्दीत नागज रस्त्यावर ऑर्केस्ट्राची परवानगी घेऊन खुले आम डान्सबार सुरू आहे.

डान्सबारवर बंदी असताना कुची हद्दीत कसा काय सुरू आहे? संबंधित डान्सबारकडे कवठेमहांकाळ पोलिसही दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, जोतिराम जाधव, सुदर्शन वाडकर, मनोज उपाध्ये, अशोक खाडे, शिवाजी पाटील, सूरज पाटील, शंकर लंगोटे, गुलाबराव जाधव, भुजंगराव पाटील आदी उपस्थित होते.