कवठेएकंदला आज दसऱ्याचा लखलखाट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

कवठे एकंद - येथे विजयादशमी दसऱ्यानिमित्त आज ग्रामदैवत श्री सिद्धराजच्या पालखी सोहळ्यासाठी होणारी पारंपरिक आतषबाजीसाठी सज्ज झाली आहे. 

आतषबाजीवेळी अपघाताची शक्‍यता लक्षात घेता यंदाही पत्रीबाण, सुतळीटमसह धोकादायक दारूकामावर बंदी घालण्यात आली आहे. यंदा आतषबाजीचा उत्सव सुखरूप पार पाडावा यासाठी प्रशासनाबरोबर, ग्रामस्थांनी धोकादायक दारूकाम टाळण्याचे ठरवले आहे. लाकडी शिंगटे, चक्रे, झाडे, पंचमुखी, सूर्यपान, कागदी शिंगटे, रंगीत कमाने तसेच पारंपरिक दारूकामाला पसंती दिली आहे. 

कवठे एकंद - येथे विजयादशमी दसऱ्यानिमित्त आज ग्रामदैवत श्री सिद्धराजच्या पालखी सोहळ्यासाठी होणारी पारंपरिक आतषबाजीसाठी सज्ज झाली आहे. 

आतषबाजीवेळी अपघाताची शक्‍यता लक्षात घेता यंदाही पत्रीबाण, सुतळीटमसह धोकादायक दारूकामावर बंदी घालण्यात आली आहे. यंदा आतषबाजीचा उत्सव सुखरूप पार पाडावा यासाठी प्रशासनाबरोबर, ग्रामस्थांनी धोकादायक दारूकाम टाळण्याचे ठरवले आहे. लाकडी शिंगटे, चक्रे, झाडे, पंचमुखी, सूर्यपान, कागदी शिंगटे, रंगीत कमाने तसेच पारंपरिक दारूकामाला पसंती दिली आहे. 

"श्रीं' च्या पालखी सोहळ्यास आज (ता.30) रात्री नऊपासून प्रारंभ होणार आहे. मानकरी चव्हाण- पाटील यांच्या उपस्थितीत शिलंगण चौक येथे दसऱ्याचे सोने (आपटा) पूजन होऊन श्री सिद्धराज आणि श्री महालिंगराया बिरदेवाच्या पालखीसह पूजाअर्चा होऊन आरती-दिवटी, छत्र चामर, अश्वासह दिमाखात शिलंगण उत्सवास प्रारंभ होतो. रस्त्याच्या दुतर्फा भाविक, ग्रामस्थांकडून शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. आतषबाजीच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळेच महाराष्ट्रची शिवकाशी अशी ओळख गावाला मिळाली आहे. आतषबाजीचा उत्सव सुखकर करण्यासाठी यात्रा समिती, प्रशासन, पोलिसांकडूनही प्रबोधन करण्यात येत आहे 

यंदा लक्षवेधी आकर्षण तोडकर बंधूंचे उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा देखावा सादर करण्यात येणार आहे. ए-वन मित्र मंडळ, एगल फायर वर्क्‍स यांच्याकडून नयनरम्य आतषबाजी, झुंबर औट तसेच इतरही आतषबाजी करण्यात येणार आहे. महावीर दारू शोभा मंडळ, नवरंग, नवतरंग, अहिंसा, आकशदीप, हिंदू- मुस्लिम मित्रमंडळ अशा इतर ही मंडळाकडून आतषबाजीसह फुगडी, सूर्यचक्र, दांडपट्टा, एस, कमान आदी प्रकार सादर होणार आहेत.

मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्य पान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारूकामाबरोबर गोल्डनची वेस, सिद्धिविनायकचा सूर्य व ऑलिंपिक फायरशो औटांची बरसात, "आकाशदीप'चे सोनेरी ठिणग्यांचे झाडकाम, नवरंग, बसवेश्वर, सप्तरंगचे रंगीत चक्रे, कोरे अड्ड्याची लाकडी शिंगटे, तर ए-वन मंडळाकडून श्री सिद्धराज महाराजांना अभिवादन, तर आतषबाजीचा "डिजिटल कारंजा' साकारण्यात येणार आहे. सुसंघ मंडळ (ब्राह्मणपुरी) सप्तमुखी, पंचमुखी झाडकाम लक्षवेधी आहे, असे शिवराम (बाबा) पुजारी, दत्ता पुजारी, सुहास कुलकर्णी, पांडू उमडाळे यांनी सांगितले. 

अग्निपुत्र अजिंक्‍यतारा मंडळाचे कागदी शिंगटांचा दरारा ही खास आतषबाजी, बाबासाहेब माळी अड्डयांचे दोन कारंजा स्पेशल शिंगटे, हर हर दारू शोभा मंडळ, अंबिका दारू शोभा मंडळ, श्रीराम, हिंदमाता, शहीद भगतसिंग, सिद्धिविनायक, शाक्‍यसिंह यांच्या औटांची आतषबाजी; अजिंक्‍यतारा, लव-अंकुश, त्रिमूर्ती, महावीर ची लाकडी शिंगटे, कागदी शिंगटे लक्षवेधी ठरणार आहेत. जमादार दारू शोभा मंडळाकडून राक्षस संहार आतषबाजीतून साकारण्यात येणार आहे. जावेद जमादार, कयुम मुलाणी, रफिक जमादार, मुराद जमादार, बाबासाहेब थोरात, किसन गुरव परिश्रम घेत आहेत. सिद्धराज फायर वर्क्‍सने पंचमुखी कारंजा, उगवता सूर्य देखावे साकारले आहेत. विठ्ठल चौक महाकाय भस्मासुराचे दहन करण्यात येणार आहे. राक्षसांची 20 फुटी प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. 

चोख बंदोबस्त 
दसऱ्याच्या पार्श्वभूमी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तसेच दोन अंबुलन्स, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन, पालखी मार्गावर फिरता ध्वनिक्षेपक, चौकाचौकांत प्राथमिक स्वरूपाचे औषधोपचार करण्याची सोय केली आहे.