भाजीपाला विक्रेत्यांत दर ठरवण्यावरून मतभेद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

टोमॅटोची लाली उतरली, मिरचीचा तिखटपणा कायम 
सांगली - सांगली, मिरज परिसरातील नियमित आणि आठवडा बाजारात भाजीपाला विक्रेत्यांत दर ठरवण्यावरून मतभेद समोर येऊ लागलेत.

भाजीपाल्याच्या दरात दररोज मोठा चढ-उतार होताना दिसतोय. त्यामागे या मतभेदाचे कारण समोर येत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतोय.

टोमॅटोची लाली उतरली, मिरचीचा तिखटपणा कायम 
सांगली - सांगली, मिरज परिसरातील नियमित आणि आठवडा बाजारात भाजीपाला विक्रेत्यांत दर ठरवण्यावरून मतभेद समोर येऊ लागलेत.

भाजीपाल्याच्या दरात दररोज मोठा चढ-उतार होताना दिसतोय. त्यामागे या मतभेदाचे कारण समोर येत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतोय.

दरम्यान, बाजारात ६० ते ८० रुपये किलो झालेल्या टोमॅटोची लाली आता उतरली आहे. तो ४० रुपये किलो झाला आहे. मिरचीचा तिखटपणा कायम आहे. ती ८० ते ९० रुपये किलो आहे. ढबू ६०, कोबी ६०, वांगी ८०, भेंडी ७०, फ्लॉवर ८०, पडवळ ६०, गवारी ६०,  कारली ६०, आले ४०, लसून ५० ते ७०, कांदा १५  ते २०, बटाटा १५ ते २०, वाटाणा ५०, दोडका ६० रुपये किलो आहे. पालेभाज्यांचे दर आवाक्‍यात आलेत. मेथी ५ ते १० रुपयांना पेंडी आहे. कोथिंबिरीची जुडी आता पाच रुपयांना मिळू लागली. श्रावणात शुद्ध शाकाहारी बनलेल्यांसाठी ही सुखावणारी गोष्ट ठरतेय.  

हा दर बाजार स्थिरावला जावा, असे काही विक्रेत्यांचे  मत दिसतेय. काहींनी बाजारातील आवक वाढल्यानंतर दर झपाट्याने खाली आणले, त्यामुळे बाजारात एकमेकांविषयी कुजबूज कानी येताना दिसते. जून, जुलै महिन्यात पाऊस कमी राहिला. परिणामी भाजीपाला आवक घटली. दराचा आलेख सतत वाढत राहिला. आवक वाढल्यानंतर दर कमी झाले पाहिजेत, मात्र काही व्यापाऱ्यांनी त्याबद्दल उटल भूमिका घेतली. दर चढेच ठेवले. त्यातून बाजारात वेगवेगळे चित्र निर्माण झाले. ते ग्राहकांच्या नजरेतून सुटले नव्हते. मिरज  शहरात हा प्रकार अधिक पहायला मिळाला. 

सिमेंट दर १० ने कमी 
सिमेंट (५० किलो) - ३०० ते ३१०; वीट (प्रति हजार- ४ इंची) - ४४०० ते ४५००; (६ इंची) - ८८०० ते ९०००; वाळू- प्रति ब्रास - ७८०० ते ८५००; खडी (पाऊण इंची प्रति ब्रास) - ३१०० ते ३२००; सळी (प्रतिटन) - ४७५०० ते ४९०००

केळी २५ ते ४० रुपये
श्रावणात फळांच्या दरात वाढ होते. विशेषतः पूजेसाठी केळीला मोठी मागणी असते. सध्या केळी २५ ते ४० रुपये डझन आहेत. देशी केळीला मागणी आहे. आठवडा, पंधरा दिवसांत काश्‍मीरचे सफरचंद सुरू होतील.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या...

02.39 AM

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे...

01.39 AM

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील...

12.24 AM