अनंत चतुर्दशी दिवशी डॉल्बीसाठी मनाई आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सांगली - गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (ता. ५) अनंत चतुर्दशी दिवशी होत आहे. या दिवशी जिल्ह्यात सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्या दिवशी मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी उद्यापासून तीन दिवस जिल्ह्यात कलम १४४ (१) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार डॉल्बीमालकांनी, गणेश मंडळांनी मिरवणुकीवेळी डॉल्बी सिस्टीम बंद करून ठेवावी अन्यथा संबंधितांवर फौजदारी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात निघतात. यामध्ये डॉल्बीचा वापर केला जातो, मात्र डॉल्बीने ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणशोत्सवाची संकल्पना गेले दोन वर्ष राबवण्यात येत आहे. गतवर्षी डॉल्बी वापरणाऱ्या मंडळांवर कारवाई केली होती. यंदाही डॉल्बीला मनाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.

यंदा जिल्ह्यात एकूण १७२४ विशेष करून मिरज शहरात १८२ मंडळांच्या विसर्जन मिरवणुका होणार आहेत. शासनाने रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली आहे, मात्र त्यानंतर ते बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे मिरवणूक थांबवून दुसऱ्या दिवशी पुन्हा मिरवणूक पुढे काढायची, असा काही मंडळाचा प्रयत्न असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे; मात्र असा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. त्यामुळे मिरवणूक प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गानेच मिरवणूक काढायची आहे. अन्यथा फौजदारी कारवाई केली जाणार आहे.