तरुणांना सेवारती पुरस्कार स्फूर्तिदायी - डॉ. पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सांगली - अखंड आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी झटणारे स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे अभिनंदनीय बाब आहे. उत्तुंग यशाची स्वप्ने पाहून त्यांच्या पूर्ततेसाठी वाटचाल करणाऱ्या तरुणांना ‘सेवारती’ पुरस्कार स्फूर्तिदायक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते भारत पाटणकर यांनी केले.

स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सेवारती पुरस्कार नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांना आज श्रीमती शांताताई कराडकर आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या लोकरंगभूमी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘सध्या जात आणि धर्माच्या नावावर संघर्ष सुरू आहेत. अशा वेळी स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर यांच्यासारख्या आयुष्यभर मूल्य जपणाऱ्या क्रांतिवीरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे गरजेचे आहे.’’

पुरस्काराला उत्तर देताना गौतम पाटील म्हणाले, ‘‘शांतिनिकेतन ही राजकारणविरहित काम करणारी संस्था आहे. या पुरस्काराने जबाबदारीत वाढ झाली आहे.’’ 

प्रास्ताविक महेश कराडकर यांनी केले. डॉ. दिलीप शिंदे, मराठा समाजचे तानाजीराव मोरे, ज्येष्ठ लोकसाहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वल साठे यांनी मानपत्रवाचन केले. या वेळी डॉ. अनिल मडके, प्रमोद चौगुले, डॉ. नितीन नायक, डॉ. मोहन पाटील, डॉ. अविनाश पाटील, अरुण दांडेकर, ए. डी. पाटील, समिता पाटील, मिलिंद खिलारे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: sangli news dr bharat patankar talking