"अंनिस'चे सांगलीत जवाब दो आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सांगली - "अंनिस'चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन चार वर्षं पूर्ण झाली. मात्र आजतागायत खुनातील सूत्रधार सापडलेले नाहीत. सरकारला याचा जाब विचारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध पुरोगामी संघटनांतर्फे डॉ. दाभोलकरांच्या चौथ्या स्मृतिदिनी आज "जवाब दो' आंदोलन झाले. सनातन संस्थेची चौकशी करण्यात यावी आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महात्मा गांधी पुतळ्यासमोर भर पावसात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जवाब दो धरणे आंदोलन झाले.

सांगली - "अंनिस'चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन चार वर्षं पूर्ण झाली. मात्र आजतागायत खुनातील सूत्रधार सापडलेले नाहीत. सरकारला याचा जाब विचारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध पुरोगामी संघटनांतर्फे डॉ. दाभोलकरांच्या चौथ्या स्मृतिदिनी आज "जवाब दो' आंदोलन झाले. सनातन संस्थेची चौकशी करण्यात यावी आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महात्मा गांधी पुतळ्यासमोर भर पावसात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जवाब दो धरणे आंदोलन झाले. या वेळी सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेने प्रसिद्ध केलेली दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रांची पत्रके वाटली. आंदोलनानंतर पोलिस अधीक्षकांना सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावावीत. "सनातन'ची चौकशी करावी. साधकांवर पोलिसांनी नजर ठेवावी. "सनातन'वरील बंदीबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

आंदोलनात अंनिसचे कार्यकर्ते प. रा. आर्डे, राहुल थोरात, डॉ. बाबूराव गुरव, तारा भवाळकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. नितीन शिंदे, विजयकुमार जोखे, अजय भालकर, फारूख गवंडी, मुनीर मुल्ला, सुनील भिंगे, नामदेव करगणे, अमित शिंदे, अमित ठाकर, डॉ. संजय निटवे यांच्यासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: sangli news Dr. Narendra Dabholkar